डिलिमिटेशन बिलावर ठाकरेसेना काय निर्णय घेणार? खासदाराच्या व्यक्तव्याने संभ्रम वाढला

Delimitation Bill Row: डिलिमिटेशन विधेयकावर ठाकरे सेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. विधेयकाला पाठिंबा नाही आणि विरोधही नाही, असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.
DelimitationBill
DelimitationBillsaam tv
Published On: 

गिरीश कांबळे, साम टीव्ही

देशातील राजकीय वर्तुळात सध्या डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. या विधेयकावर ठाकरे गटाच्या शिवसेनेने तूर्तास 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. या विधेयकाला आमचा पाठिंबा नाही आणि विरोधही नाही. प्रत्यक्ष विधेयक आल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. डिलिमिटेशन विधेयकाबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान संसदेचं अधिवेशन होणार आहे. मात्र, अद्याप अधिवेशनाचा अजेंडा जाहीर झालेला नाही. डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार आहे की नाही, याबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे विधेयक समोर आल्यानंतरच त्यावर निर्णय घेतला जाईल.

DelimitationBill
Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

काँग्रेसने या विधेयकाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली, तरी ठाकरे सेनेची भूमिका सध्या तितकी ठाम नाही. इंडिया आघाडीची भूमिका वेगळी असू शकते आणि ठाकरे सेनेची स्वतंत्र भूमिका असू शकते, असंही सावंत यांनी स्पष्ट केलं.

DelimitationBill
Marathwada Yatra: ३ वर्षांतून एकच यात्रा, पण असते तब्बल ३३ दिवसांची! बीडच्या पुरुषोत्तमपुरीत देशातील अनोखा यात्रोत्सव

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयक आणण्यामागे राजकीय गणित असल्याचा संशयही अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या प्रक्रियेला घाई केली जात असल्याचे ते म्हणाले. मार्च महिन्यात मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचं नियोजन असू शकतं, असंही ते म्हणाले. यापूर्वी डिलिमिटेशन विधेयक सादर करण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही निवडक खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व राज्यांमध्ये ५० टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या बैठकीला आपण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होतो, अशी माहिती सावंत यांनी दिली. त्यावेळी सध्याच्या ५४४ जागांच्या संख्येनुसार ५० टक्के जागा वाढवण्याची भूमिका आम्ही मांडली होती, असंही त्यांनी सांगितलं.

DelimitationBill
Nashik : दिवाळीत कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकींचा मृत्यू; तिघांच्या मृत्यूनं हळहळ

संसदेतील खासदारांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं सांगतानाच, सध्याच्या सभागृहात अनेक खासदारांना बोलण्याची पुरेशी संधी मिळत नसल्याचा मुद्दाही सावंत यांनी उपस्थित केला. एकूणच, डिलिमिटेशन विधेयकाबाबत ठाकरे सेनेने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. विधेयकाचा मसुदा आणि त्यातील तरतुदी समोर आल्यानंतरच पक्ष आपली पुढील भूमिका निश्चित करणार असल्याचं अरविंद सावंत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.