मुंबई, ठाण्याहून कल्याणला काही मिनिटांत पोहोचणार; मेट्रो-५ मार्गिकेतील मोठा अडथळा दूर, महत्वाची अपडेट समोर

metro 5 update : मेट्रो-५ मार्गिकेतील मोठा अडथळा दूर झालाय. या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर आली आहे.
metro 5
metro 5 updateSaam tv
Published On
Summary

मेट्रो-४ आणि मेट्रो-५ जोडण्यातील मोठा अडथळा दूर झालाय

कापूरबावडी परिसरातील इमारत हटवणे सुरू

मेट्रो-४ चे ७४% आणि मेट्रो-५ चे ९५% काम पूर्ण झालंय

मुंबई आणि ठाण्याहून कल्याणला दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कल्याणदरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो २ मार्गिकेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे ही मार्गिका आता मेट्रो-४ आणि मेट्रो ५ कॉरिडोरला जोडण्याचं काम पूर्ण केलं जाईल.

ठाणे ते कापूरबावडी जंक्शनवर मेट्रो मार्गावरील इमारतीमुळे मेट्रो ४ आणि मेट्रो ५ ला जोडण्याचं काम रखडलं होतं. आता एमएमआरडीएने इमारत रिकामी करून तोडण्याचं सुरू झालं आहे. ही इमारत हटवल्याने एमएमआरच्या २ महत्वाच्या मेट्रो मार्गिका जोडण्याचं काम वेगाने पूर्ण होईल.

वडाळा-कासरवडवली गायमुख दरम्यान मेट्रो-४ आणि ठाणे-भिवंडी-कल्याणदरम्यान मेट्रो-५ कॉरिडोर जोडण्याचं काम सुरू आहे. मेट्रो ४ मार्गिकेचं काम ७४ टक्के पूर्ण झालं आहे. तर मेट्रो-५ मार्गिकेच्या ठाणे ते भिवंडीदरम्यान काम ९५ टक्के पूर्ण झालं आहे. ठाणे ते भिवंडीदरम्यान मेट्रो मार्गिकेवर अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे.

metro 5
अजितदादांची राजकीय हत्या? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ, VIDEO

एमएमआरडीएने ठाणे ते घोडबंदर रोडवर १० किमी मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी ट्रायल रन सुरू करण्यात आला आहे. प्राधिकरणाने कॅडबरी जंक्शन ते गायमुखदरम्यान २०२६ मध्ये मेट्रोची सेवा सुरू करण्याची योजना आहे. मेट्रो-४ ते मेट्रो-५ मार्गिकेला जोडणाऱ्या मेट्रो-५ मार्गावर लवकरच मेट्रो ट्रायल रनचा मार्ग मोकळा झाला आहे.

metro 5
पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

मेट्रो-५ च्या पहिल्या टप्प्यात मार्गाजवळ मेट्रो कारशेड तयार करण्याचं काम सुरू आहे. कशेळी कारशेड कापूरबावडीजवळ ४-५ किमी दूर आहे. कशेळी कारशेडजवळ काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएच्या मेट्रो-४ च्या कारशेडची अडचण दूर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com