Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.
हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये किटली कुठे ठेवली हे तुम्हाला ओळखायचे आहे.
सुरूवातीला किटली शोधणे हे तुम्हाला सोपे वाटू शकते. परंतु या फोटोमध्ये किटली अशा ठिकाणी आहे जे शोधणे आव्हानात्मक आहे. या फोटोमध्ये विविध गोष्टी दिसत आहेत. विविध रंगात आणि आकारात घरातील बऱ्याच वस्तू आहेत त्यामध्ये किटली शोधणे कठीण असू शकते.
तुमची नजर प्रत्येक गोष्टीकडे फिरवल्यास तुम्हाला या वस्तूंमध्ये किटली दिसू शकते. फोटोमध्ये किटली शोधण्यासाठी तुम्हाला १० सेकंदाची वेळ आहे.
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.