Mumbai Dam Water Level  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ, पाहा आजची ताजी आकडेवारी

Water Storage Increases In Mumbai Dam: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २९.७३ टक्के म्हणजेच ३० टक्के इतका आहे. कालच्या तुलनेत या पाणीसाठ्यामध्ये ४ ते ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Priya More

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणक्षेत्रामध्ये सध्या चांगला पाऊस पडत आहे. यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईवर असलेले पाणीसंकट आता दूर होण्याची शक्यता आहे.

१४ जुलै रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी पातळी एकूण १४४७६३ ML इतकी नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण २९.७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील आजचा एकूण पाणीसाठा २९.७३ टक्के म्हणजेच ३० टक्के इतका आहे. काल सातही धरणात २५ टक्के पाणीसाठा होता. कालच्या तुलनेत आजच्या पाणीसाठ्यात ३ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

गेल्या महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईवर असलेले पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याची १४ तारीख आली तरी देखील मुंबईसह राज्यात म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे मुंबईसह प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा मागच्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - १.९० टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ४५.७१ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ६०.८५ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - २७.०७ टक्के पाणीसाठा

- भातसा - २८.७० टक्के पाणीसाठा.

- विहार - ५२.०८ टक्के पाणीसाठा.

- तुलसी - ७६.५४ टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT