शहापूर : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. दारूची पार्टी करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोन जण वाहून गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एकाला वाचविण्यात यश मिळाले. मात्र एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा धरणाच्या गेटवर स्थानिक नागरिकांना जंगलात जनावरे चारण्यासाठी मनाई केली जाते. मात्र बाहेरील लोक येथे दारू व मटणाची पार्टी करण्यासाठी गेटमधून धरणाच्या खाली कसे सोडले जातात; असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मध्य वैतरणा धरणावर जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे गेट आहे. हे गेट ओलांडून पुढे धरणाच्या खाली जावे लागते.
दरम्यान नाशिकहून पाच मित्र दारू व मटणाची पार्टी करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाच्या खाली गेले होते. संध्याकाळी धरणाच्या वाहत्या पाण्यात उतरल्याने पाच मित्रांपैकी दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. वाहून गेलेल्या दोन जणांपैकी स्थानिक नागरिकांनी एकाला जखमी अवस्थेत बाहेर काढले. तर एकाचा मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.