Mumbai Nashik Highway : चौथ्या दिवशीही मुंबई- नाशिक महामार्ग जाम; पुलाचे काम संथ गतीने होत असल्याने समस्या

Shahapur News : मुंबई- नाशिक महामार्गावर आसनगाव व वाशिंद येथे उड्डाण पूलाचे काम सुरु आहे
Mumbai Nashik Highway
Mumbai Nashik HighwaySaam tv

फय्याज शेख 

शहापूर : मुंबई- नाशिक महामार्गावरील वाशिंद व आसनगाव या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम सुरु आहे. हे काम अगदी संथगतीने सुरू असल्याने उड्डाण पुलाच्या कामामुळे या महामार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. आज देखील सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

Mumbai Nashik Highway
Amravati News : अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे ६५ टक्के पेरण्या रखडल्या; शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा

मुंबई- नाशिक महामार्गावर आसनगाव व वाशिंद येथे उड्डाण पूलाचे काम सुरु आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनासाठी पर्यायी मार्ग म्हणून दोन्ही बाजूने कच्चा रास्ता तयार करण्यात आला आहे. मात्र ठेकेदाराने येथे कच्च्या स्वरूपात दगड व मातीने रस्ता बनविला असल्याने यंदाच्या पहिल्याच (Rain) पावसात मोठ मोठे खड्डे पडून रस्ता वाहून गेला आहे. यामुळे येथून जाणारे अवजड वाहन अगदी हळूहळू न्यावे लागण आहे. परिणामी ही वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. 

Mumbai Nashik Highway
Cyber Crime : शेतकऱ्याची ९५ लाखांत फसवणूक; शेअर मार्केटमध्ये ज्यादा पैसे कमविण्याचे आमिष

वाहतूक कोंडी होत असल्याने मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होत असून दररोज या ठिकाणी ५ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. येथून मार्ग काढताना साधारण एक तासाचा कालावधी लागत आहे, यामुळे प्रवाशांसह स्थानिक जनतेला देखील मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com