Cyber Crime : शेतकऱ्याची ९५ लाखांत फसवणूक; शेअर मार्केटमध्ये ज्यादा पैसे कमविण्याचे आमिष

Nashik News : अनोळखी मोबाइल क्रमांकावरून शेतकऱ्याला आलेल्या कॉलनंतर जुजबी माहितीच्या आधारे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग सुरू केले.
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये जादा पैसे कमावण्याचे आमिष दाखवून जाळ्यात फसवत एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. यात शेतकऱ्याचे ९४ लाख ८६ हजार रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. 

Cyber Crime
Sambhajinagar News : दोन एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक फेकले उपटून; पाऊस नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान

अनोळखी मोबाइल क्रमांकावरून शेतकऱ्याला आलेल्या कॉलनंतर जुजबी माहितीच्या आधारे ऑनलाइन शेअर ट्रेडिंग सुरू केले. यात (Farmer) शेतकऱ्याला शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवून जादा पैसे कमविण्याचा मोबदला देण्याचे आमिष दिले. या दरम्यान विविध बँकांत वेळोवेळी ९४ लाख ८६ हजार ऑनलाइन भरले. मात्र अकरा महिन्यांनंतर खरेदी केलेले शेअर्स विक्री करण्यास सांगितले (Cyber Crime) असता संशयितांनी आणखी पैसे भरण्यास सांगितले.

Cyber Crime
Dog Attack : भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शाळेतून परतणाऱ्या पाच चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला

मात्र यावेळी शेतकऱ्याला  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. दरम्यान या प्रकारात शेतीत कमावलेली रक्कम गमावण्याची वेळ आली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com