Sambhajinagar News : दोन एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक फेकले उपटून; पाऊस नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील तिडका येथील एका शेतकऱ्याने पावसा अभावी आपल्या शेतात लावलेल्या दोन एकर क्षेत्रावरील मिरची पीक उपटून फेकले आहे
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : सुरवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. यामुळे दोन एकर क्षेत्रात लागवड केलेले मिरचीचे रोप कोमेजू लागले आहे. यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्याने हे संपूर्ण रोप उपटून फेकल्याचा प्रकार सोयगाव तालुक्यात घडला आहे. 

Sambhajinagar News
Sambhajinagar News : संभाजीनगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, दोघे संशयित; आरोग्य विभाग सतर्क

छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील तिडका येथील एका शेतकऱ्याने पावसा अभावी आपल्या शेतात लावलेल्या दोन एकर क्षेत्रावरील मिरची पीक उपटून फेकले आहे. या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात लागवड केलेले मिरची पिकासाठी आतापर्यत लाखाच्या जवळपास खर्च आला होता. मात्र, जून महिन्यात पाऊस न झाल्याने व विहिरीने तळ गाठल्याने पाण्याअभावी मिरची पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. 

Sambhajinagar News
Dog Attack : भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शाळेतून परतणाऱ्या पाच चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला

दुबार पेरणीचे संकट 

दरम्यान सावळद बारा मंडळ वगळता इतर बनोटी, जरंडी आणि काही मंडळ कोरडेठाक असल्याने त्या भागातील (Farmer) शेतकऱ्यावर दुबार पेरणीची देखील वेळ आली आहे. पहिल्या पावसात पेरणी केली होती. मात्र आता पाऊस नसल्याने जमिनीतून निघालेले कोम आता कोमेजू लागले आहेत. यामुळे पाऊस लवकर आला नाही तर कोम जळण्याची भीती असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com