Dog Attack : भटक्या कुत्र्यांचा हैदोस; शाळेतून परतणाऱ्या पाच चिमुकल्यांवर जीवघेणा हल्ला

Palghar News : बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असून याकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे
Dog Attack
Dog AttackSaam tv

पालघर : बोईसर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या पाच चिमुकल्या विद्यार्थ्यांसह रस्त्याने जाणाऱ्या तिघांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात आठ जण जखमी झाले आहेत. 

Dog Attack
Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू; दोन महिन्यांनी जाणवली रेबीजची लक्षण

बोईसर शहरात सध्या मोठ्या (Palghar) प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढत असून याकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान बोईसरच्या ओसवाल परिसरात भटक्या कुत्र्यांनी पाच शाळकरी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह तीन इसमांवर जीवघेणा हल्ला (Dog Attack) केला. यावेळी या भटक्या कुत्र्यांनी आठही जणांच्या पायाला आणि हाताला गंभीर इजा केली. यामुळे परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे.  

Dog Attack
Sambhajinagar News : संभाजीनगरात आढळला डेंग्यूचा रुग्ण, दोघे संशयित; आरोग्य विभाग सतर्क

आठही जणांवर उपचार सुरु 

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आठही जणांवर सध्या बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com