Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू; दोन महिन्यांनी जाणवली रेबीजची लक्षण

Jalgaon News : दोन महिन्यांपूर्वी कोळगाव वीज उपकेंद्राच्या रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतला होता
Dog Bite
Dog BiteSaam tv
Published On

भडगाव (जळगाव) : मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या असून पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे घडली आहे. 

Dog Bite
Kalyan News : लोकार्पणानंतरही महापालिकेच्या ई बस सहा महिन्यांपासून धुळखात: केडीएमटीची अनास्था, ठाकरे गट आक्रमक

भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील खेडगाव येथील सुरेश नामदेव मोरे (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी कोळगाव वीज उपकेंद्राच्या रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० जणांना चावा घेतला होता. सुरेश मोरे देखील त्या दिवशी कामावरून दुचाकीने घरी परत येत असताना या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा (Dog Bite) घेतला होता. त्याने गुढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यावरील इंजेक्शन घेतले होते.

Dog Bite
Wardha News : दारूबंदी कायद्याचा फायदा काय; बनावटी दारूचा वापर सुरूच, वर्ध्यात धरणे आंदोलन

मात्र, मागील दोन दिवसांपासून त्याला अस्वस्थ वाटत होते. हवा, पाण्याला घाबरणे आदी रेबीज रोगाची लक्षणे जाणवू लागली होती. यानंतर त्याला २५ जूनला धुळे येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यास रेबीजची लक्षणे तीव्र होत त्रास अधिकच जाणवू लागला. यानंतर त्याला नातेवाइकांनी घरी परत आणत असताना त्याचा मृत्यू झाला. परिवारातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर संकट ओढवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com