Kalyan News : लोकार्पणानंतरही महापालिकेच्या ई बस सहा महिन्यांपासून धुळखात: केडीएमटीची अनास्था, ठाकरे गट आक्रमक

Kalyan News : दोन दिवसात बस रस्त्यावर उतरल्या नाही. तर यापेक्षा मोठा वजन काटा आणून बस भंगारमध्ये विकू; असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात केंद्र सरकारच्या योजनेतून ९ ई बस दाखल झाल्या होत्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. मात्र सहा महिन्यानंतर देखील केडीएमटी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे बस तांत्रिक प्रक्रियेत अडकल्या असून अद्यापही धुळखात उभ्या आहेत. या विरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यानी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Kalyan News
Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी; पेरणीच्या कामाला वेग

सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या इ- बस रस्त्यावर न धावता धूळखात पडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून आज एसटी डेपोमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारला. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकार्याला वजन काटा भेट देत दोन दिवसात बस रस्त्यावर उतरल्या नाही. तर यापेक्षा मोठा वजन काटा आणून बस भंगारमध्ये विकू; असा इशारा देखील ठाकरे गटाने दिला. दरम्यान केडीएमटीच्या अधिकाऱ्यांनी अशा बस भारतात पहिल्यांदाच आल्या आहेत. यामुळे या बसेसचे सर्टिफिकेट बाकी होते ते मिळाले आहे. (Kalyan) रजिस्ट्रेशनची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये एक बस रजिस्टर केली असून येत्या सात दिवसात उर्वरित बस रजिस्टर करून शहरातील मार्गावर धावणार असल्याचे सांगितले.

Kalyan News
Indrayani River : इंद्रायणी नदी प्रदूषणाविरोधात आंदोलन; छावा मराठा युवा महासंघ संघटनेकडून इंद्रायणीत प्रतीकात्मक जलसमाधी

केडीएमटीच्या बस डेपोतून डिझेल चोरी?
दरम्यान इलेक्ट्रिक बसेस केडीएमपीच्या बस डेपोमध्ये धुळखात उभ्या असल्याने आज ठाकरे गटाने डेपोमध्ये आंदोलन केलं. याच दरम्यान एक रिक्षा डिझेलचे गॅलन घेऊन त्यांना डेपोच्या आवारात दिसली. त्यामुळे ठाकरे गटाने या रिक्षाला घेराव घातला. संबंधित रिक्षा चालकाकडे कागदपत्राची मागणी केली. मात्र कागदपत्र न दिल्याने डिझेल देण्यासाठी महापालिकेचे वाहन नाही का? ही डिझेल चोरी असल्याचे आरोप करत गोंधळ घातला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com