Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी; पेरणीच्या कामाला वेग

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे
Nandurbar Rain
Nandurbar RainSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात पावसाने काही भागात दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्हा वाशियांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. मुख्य म्हणजे या पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. 

Nandurbar Rain
Dengue Patients : पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण; पाच दिवसात सहा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क

यावर्षी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्याभरात शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. यात दोन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे आता पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. काही भागात पडलेल्या दमदार (Rain) पावसामुळे काही शेतकऱ्यांनी (Farmer) पेरणी करून टाकली आहे. तर उर्वरित शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागले आहेत.  

Nandurbar Rain
Gondia News : खांबावर चढून दुरुस्ती करताना विजेचा झटका लागल्याने तरुणाचा मृत्यू

कापसाची लागवड वाढणार 

नंदुरबार जिल्हाभरात २ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी होणार आहे. यात जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड केली जाणार आहे. या खालोखाल मका, तांदूळ, सोयाबीन पिकांची लागवड केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com