Gondia News : खांबावर चढून दुरुस्ती करताना विजेचा झटका लागल्याने तरुणाचा मृत्यू

Gondia News : महावितरण विभागाचे कर्मचारी लाईनमन असलेले तरोणे यांनी आपल्या कामासाठी गावातील नितेश बिसेन (वय २७) या तरुणाला काम करण्यास सांगत होते
Gondia News
Gondia NewsSaam tv

शुभम देशमुख 
गोंदिया
: चालू लाईन असलेल्या खांबावर चढून काम करत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना गोंदियाच्या दासगाव येथे घडली असून या प्रकरणी संबंधित लाईनमन विरोधात रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Gondia News
Dharashiv Bribe Case : गुन्ह्यातील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी १५ हजाराची लाच; २ पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

महावितरण विभागाचे कर्मचारी लाईनमन असलेले तरोणे यांनी आपल्या कामासाठी गावातील नितेश बिसेन (वय २७) या तरुणाला काम करण्यास सांगत होते. दरम्यान गावात लाईटची समस्या असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी तरोणे यांनी नितेश बिसेन या तरुणाला सांगितले. इतकेच नाही तर लाईट चालू असलेल्या खांबावर (Gondia) चढवून काम करून घेत होते. दरम्यान काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने नितेश बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला. 

Gondia News
Dengue Patients : पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण; पाच दिवसात सहा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क

त्या लाईनमन विरुद्ध गुन्हा दाखल 

घटनेनंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाइकांनी चांगलाच गोंधळ घातला. सदरच्या घटनेबाबतची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी रावणवाडी पोलिस ठाण्यात लाइनमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com