Wardha News : दारूबंदी कायद्याचा फायदा काय; बनावटी दारूचा वापर सुरूच, वर्ध्यात धरणे आंदोलन

Wardha News : सरकारने पन्नास वर्ष झालेल्या दारूबंदीचे फायदे सांगावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्हा ही महात्मा गांधींची कर्मभूमी असल्याने जिल्ह्यात १९७५ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. या दारूबंदीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या दारूबंदीचे फायदे काय झाले, नागरिकांच्या राहणीमानावर काय फरक पडले, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी; या मागणीसाठी वर्धेच्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ जय महाराष्ट्र युवा संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.

Wardha News
Indrayani River : इंद्रायणी नदी प्रदूषणाविरोधात आंदोलन; छावा मराठा युवा महासंघ संघटनेकडून इंद्रायणीत प्रतीकात्मक जलसमाधी

वर्धा (Wardha) जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली आहे. दारूबंदी करण्याचं उद्देश काय होता त्याची पूर्तता झाली काय? जिल्ह्याच्या नागरिकांच्या जीवनमानात, न्यायालयीन कामकाजात, प्रशासकीय कामात दारूबंदीचा काय फरक पडला हे अद्याप कळत नाहीय. उलट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावटी दारूची विक्री होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून काही लोक मनोरुग्ण झाले आहे. यामुळे सरकारने पन्नास वर्ष झालेल्या (Liquor Ban) दारूबंदीचे फायदे सांगावे अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

Wardha News
Kalyan News : लोकार्पणानंतरही महापालिकेच्या ई बस सहा महिन्यांपासून धुळखात: केडीएमटीची अनास्था, ठाकरे गट आक्रमक

जनतेला फायदे सांगा 
महाराष्ट्र सरकारने अधिवेशनात निवेदन सादर करून जिल्ह्यातील दारूबंदीचे फायदे सांगून जनतेचे समाधान करावं व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधिनी सुद्धा हा मुद्दा उचलावं असेही यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील दारूबंदी उठवावी; हा आंदोलनाचा उद्देश नाहीय पण फायदे जनतेला कळले पाहिजे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com