रामू ढाकणे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. मात्र पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला असताना पावसाळ्यातही धरणातील जलसाठा ४ टक्क्यांवरच आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जलसाठा २६.९३ टक्के इतका होता. पाऊस नसल्याने हा यंदा अद्याप पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
मराठवाड्यातील प्रमुख धरण असलेले जायकवाडी धरण (Jayakwadi dam) मागील वर्षीच्या पावसात भरले नव्हते. पाऊस कमी झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नव्हता. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीषणता अधिक प्रमाणात जाणवून आली होती. शिवाय धरणात असलेल्या पाण्याचे देखील उन्हाच्या तीव्रतेत बाष्पीभवन होऊन पाणी साठा कमी झाला होता. उन्हाळ्यात हा पाणीसाठा २ टक्क्यांवर आला होता. जून महिन्याच्या सुरवातीला झालेल्या थोड्याफार (Rain) पावसाने काहीसे पाणी धरणात आल्याने थोडी वाढ झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र हा साठा अद्याप ४ टक्क्यांवरच आहे.
तर त्या गावात पाणी टंचाईचा सामना
आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास संभाजीनगर (Sambhajinagar) आणि जालन्यासह इतर जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान जायकवाडी धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने आणि वरील भागातून देखील अद्याप आवक नसल्याने पाणीसाठ्यात घट होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलय. जायकवाडी धरणाचा जलसाठा हा मराठवाड्याची चिंता वाढवणारा आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.