Farmer Success Story : धाराशिवमध्ये दोन भावांचा खजूर शेतीचा यशस्वी प्रयोग; खजूर शेतीतून ३ लाखाचे उत्पन्नाची अपेक्षा

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या छोट्याशा गावातील वाघे बंधूनी यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांना कृषी प्रदर्शनातून खजूर शेतीची माहिती मिळाली
Farmer Success Story
Farmer Success StorySaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: पारंपरिक शेती न करता वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकरी शेतीतून चांगले उत्पन्न घेत असतात. अशाच प्रकारे धाराशिव सारख्या दुष्काळी भागात बेंबळी गावातील शेतकरी वाघे बंधू यांनी शेतीमध्ये खजुर शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. या शेतीतून या शेतकऱ्यांना जवळपास ३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. 

Farmer Success Story
Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात; देहू संस्थांकडून उभारण्यात आले नवे मंदिर

धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील बेंबळी या छोट्याशा गावातील महेश वाघे व अनुप वाघे बंधूनी यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांना कृषी प्रदर्शनातून खजूर शेतीची माहिती मिळाली. याची सविस्तर माहिती घेऊन शेती नेमकी कशी करायची, खजुराच्या झाडाची निगा कशी राखायची याबाबत माहिती करून घेतली. त्यानंतर त्यांनी एक एकरावर खजूर शेतीची लागवड करण्यासाठी सौदी अरेबिया येथून ६ लाख रुपयांची खजुराची झाडे (Farmer) आणली. एक एकराच्या क्षेत्रात एकूण ६४ झाडे लावली असून त्यांची योग्य पद्धतीने निगा राखण्याचे काम केले. 

Farmer Success Story
Kalyan News : शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीतून विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देण्यात आली होती तंबी

खजुराची शेती लागवड करून तीन वर्षानंतर त्याला पिक धारणा होते. वाघे बंधूनी कोणतेही रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. यावर्षी त्यांना खजूर शेतीसाठी ४० हजार रुपये खर्च झाला आहे. बाजारात सध्या २०० रुपये किलो दराने खजूर विक्री स्वतः वाघे बंधू करत आहेत. या खजूर शेतीतून २ टन खजूर उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. अपेक्षित उत्पन्न मिळाले तर साधारण ३ लाख रुपयापर्यंत खजूर विक्री होऊ शकते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com