Kalyan News : शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीतून विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देण्यात आली होती तंबी

Kalyan News : शाळेला माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने चौघा विद्यार्थ्यांना बोलावून शाळेतून काढण्याचा इशारा देत घरी पाठवले होते. यानंतर विद्यार्थाने टोकाचा निर्णय
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: सोशल मीडियावर चार मित्रांनी मिळून एक पोस्ट केली होती. याबाबत शाळेत माहिती झाल्यानंतर चौघा मित्रांना तंबी देत शाळेतून काढण्याबाबत सांगून घरी पाठविण्यात आले होते. दरम्यान आपल्याला शाळेतून काढून टाकतील या भीतीतून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यात घडली आहे. 

Kalyan News
Crop Insurance : सर्व्हर डाऊनची समस्या; पिक विम्याचा अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी

कल्याण (Kalyan) तालुक्यातील खडवली जवळील निंबवली गावात हि धक्कादायक घटना घडली आहे. अकरावीत शिक्षण घेत असलेला अनिष अनिल दळवी असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव असून अनिष हा कल्याण नजीक असलेल्या एका नामांकित शाळेचा विद्यार्थी (Student) होता. दरम्यान शाळेत अनिष आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. याबाबत शाळेला माहिती मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने चौघा विद्यार्थ्यांना बोलावून शाळेतून काढण्याचा इशारा देत घरी पाठवले होते. यानंतर विद्यार्थाने टोकाचा निर्णय घेतला. 

Kalyan News
Ulhasnagar News : टेम्पो चालकाने लांबविले १२ हजार लिटर खाद्यतेल; चालक उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान शाळेतून (School) हकालपट्टी होईल; या भीतीने अनिष दळवी या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या बाबत शाळा प्रशासनाने म्हणणे आहे, की मुलांनी वर्तणूक सुधारावी यासाठी ताकीद दिली होती. दुसरा आमचा काही हेतू नव्हता. मात्र आता या प्रकरणात टिटवाळा पोलीस स्टेशनने तपस सुरू केला आहे. मयत अनिषचे कुटुंब काय तक्रार देतात यांवर पुढची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com