Crop Insurance : सर्व्हर डाऊनची समस्या; पिक विम्याचा अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी

Nandurbar News : आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकरी हे एक रुपयात पिक विमा काढण्यासाठी खाजगी सायबर कॅफेंवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हांगाची रुपयात पीक विमा काढण्याची योजना जाहीर झाल्यानंतर पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांकडून लगबग सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकीकडे पीक विमा काढण्यास उदासीनता पाहण्यास मिळत असताना जे शेतकरी विमा काढण्यासाठी जात आहेत. त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे विमा भरण्यास अडचणी येत आहेत. 

Crop Insurance
Badlapur Crime : एटीएम कार्ड बदलून वृद्धेला ४० हजारांचा गंडा; बदलापुरातील घटना, एकजण पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात एक रुपयात पिक विमा काढण्याचं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकरी हे एक रुपयात पिक विमा काढण्यासाठी खाजगी सायबर कॅफेंवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.  मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकरी या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुळात नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात (Crop Insurance) पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांचा हवा तास प्रतिसाद पाहण्यास मिळत नाही. तर दुसरीकडे सर्व्हर डाऊनची समस्या देखील भेडसावत आहे. 

Crop Insurance
Ulhasnagar News : टेम्पो चालकाने लांबविले १२ हजार लिटर खाद्यतेल; चालक उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात

मुदत वाढवून देण्याची मागणी 

पीक विम्याचा फॉर्म भरण्यासाठी १५ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली असल्याने शेतीचे कामे सोडून शेतकरी (Farmer) सीएससी सेंटरवर फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. मात्र सर्वर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पीक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी देखील आता शेतकरी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com