Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा मुक्काम यंदा नव्या मंदिरात; देहू संस्थांकडून उभारण्यात आले नवे मंदिर

Pandharpur News : आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. याशिवाय आषाढीची पायी वारी काढत प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील विविध भागातून पालखी पंढरपूच्या दिशेने येत आहे
Sant Tukaram Maharaj Palkhi
Pandharpur NewsSaam tv

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. याशिवाय दरवर्षी पंढरपुरात राज्यभरातून पायी वारी करत पालख्या दाखल होत असतात. यात पंढरपूर वारीतील प्रमुख पालखी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. पंढरपुरात पाळख दाखल झाल्यानंतर पादुकांचा मुक्काम नव्या मंदिरात होणार आहे. 

Sant Tukaram Maharaj Palkhi
Crop Insurance : सर्व्हर डाऊनची समस्या; पिक विम्याचा अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी

आषाढी यात्रेनिमित्ताने (Ashadhi Wari) पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. याशिवाय आषाढीची पायी वारी काढत प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील विविध भागातून पालखी पंढरपूच्या दिशेने येत आहे. आषाढी एकादशी आता सहा दिवसांवर आल्यानंतर मंदिर समितीकडून देखील जोरदार तयारी सुरु आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पालखी व वारकऱ्यांसाठी राहण्याची सुविधा मंदिर समितीने केली आहे. (Chandrabhaga River) चंद्रभागेच्या तीरावर जागा तयार करून येथे पालखी व वारकरी थांबू शकतील याची सुविधा करण्यात आलेली आहे. तर मुख्य पालख्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. 

Sant Tukaram Maharaj Palkhi
Kalyan News : शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीतून विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल; सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देण्यात आली होती तंबी

देहू संस्थांचे उभारले नवीन मंदिर 

प्रदक्षिणा मार्गावरील संभाजी चौकात नवीन संत तुकाराम महाराज मंदिर उभारले आहे. या नव्या कोऱ्या मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा (Pandharpur) पंढरपुरात मुक्काम असणार आहे. देहू संस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन पादुका मंदिराची इमारत बांधण्यात आली आहे. पाच मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. पूर्वी कालिका देवी मंदिरा नजीकच्या जुन्या मंदिरात पदुकांचा मुक्काम असायचा. आता मात्र देहू संस्थानच्या नव्या इमारतीत मुक्काम असणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com