Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

Income Tax Return: आयटीआर भरूनही टॅक्स रिफंड मिळाला नाही? चुकीचे बँक खाते, IFSC, PAN लिंक, e-KYC किंवा इतर त्रुटींमुळे रिफंड अडकू शकतो. कारणे आणि उपाय जाणून घ्या.
Income Tax Return
Income Tax Returnmeta ai
Published On

जर तुम्हाला ITR फाईल करून बरेच दिवस उलटून गेले असतील तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. एका करदात्याने ३१ जुलै रोजी ITR फाईल केला आणि त्यांना २४ तासांच्या आत रिफंड सुद्धा मिळाला. पण तुम्हाला रिफंड आला नसेल, रखडलेला असेल तर त्याचे मुळ कारण तुम्ही जाणून घेतले पाहिजे.

इनकम टॅक्स डिपॉर्टमेंटच्या e-Filing या अधिकृत पोर्टलवर दाखवलेल्या आकडेवारीनुसार ४ ऑगस्टपर्यंत ६ कोटींपेक्षा जास्त रिटर्न फाइल करण्यात झाल्या आहेत. यामध्ये ५.६५ कोटींपेक्षा जास्त ITR पडताळणी आणि ३.६५ कोटींपेक्षा जास्त प्रोसेस झाल्या होत्या. आत्तापर्यंत मोठ्या संख्येने रिफंड जाहीर केले असतील, मात्र काहींना अजूनही रिफंड आलेला नाही.

Income Tax Return
Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

रिफंड न येण्याचे कारण

CA संतोष मिश्रा म्हणतात की, आयकर विभागाकडून येणारा रिफंड बऱ्याचदा खात्यात येताना फेल होऊ शकतो. त्यामध्ये काही चुका आढळतात. करदात्याची माहिती चुकीची ठरू शकते, खात्याची स्थिती किंवा अपडेट नसते, मेल न येण्यामुळे तुमचा रिफंड अडकू शकतो. तसेच चुकीचे बँक खाते, चुकीचा खात्याचा नंबर , अपडेट न केलेलं खातं, ई-केवायसी न केलेले खातं असेल तर तुम्ही ही माहिती नीट तपासणं गरजेचं आहे. काही जण बंद खात्यांचा नंबर देतात. आयएफसी कोड चुकीचा देणे, पॅन कार्ड बँकेशी जोडलेले नसणे या सर्व कारणांमुळे तुमचा रिफंड बँक पास करू शकत नाही.

Income Tax Return
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

रिफंड मिळायला किती कालावधी लागतो?

तुमचा ITR प्रोसेस झाला असेल तरी लगेचच तुमच्या खात्यात रिफंड पाठवला जात नाही. काहीवेळेस २४ तासांच्या आत काहींना रिफंड दिला जातो. तर कधीकधी ४ किंवा ५ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. जर या कालावधीत रिफंड मिळाला नाही तर, करदात्यांनी त्यांच्या टॅक्स रिटर्नमधल्या अडचणींबद्दल त्यांना कोणतीही सूचना मिळाली आहे का, आयकर विभागाकडून आलेले ईमेल किंवा एसएमएस अलर्ट मेसेज तपासले पाहिजेत आणि आयकर-ई - फायलिंग पोर्टलवर परताव्याची स्थिती तपासली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com