Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

Shravan Horoscope 2026: श्रावण महिन्यात काही राशींच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे. यामध्ये पैशांच्या समस्या दूर होतील आणि करिअरमध्येही मोठा बदल होणार आहे.
Shravan Horoscope 2026
Shravan Horoscope 2026meta ai
Published On

श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्यांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेकजण उपासना, पूजा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात. अशातच जगप्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका भविष्यवाणीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, ५ ते ९ ऑगस्ट हा कालावधी पुढील ५ राशींसाठी भरभराटीचा असणार आहे. पण अशा भविष्यवाण्या श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासावर आधारित असतात.

कोणत्या दिवशी होणार जास्त लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावण महिन्यात काही राशी लखपती होतील अशी शक्यता आहे. ५ ते ९ ऑगस्टदरम्यान 5 राशींसाठी उत्तम पवित्र सकारात्मक काळ असेल. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता. करिअर, आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जीवनात चांगल्या घडामोडी घडू शकतात.

Shravan Horoscope 2026
Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळ्यामागे तब्बल इतके वाढले, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

कोणत्या राशींना काय लाभ होऊ शकतो?

मेष: आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पूर्ण व्हायला मदत मिळू शकते आणि त्यातील अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्क: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. शुभ बातमी मिळण्याची तसेच आर्थिक लाभाची शक्यता वर्तवली जात आहे.

Shravan Horoscope 2026
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार? कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट

कन्या: घर, वाहन किंवा इतर महत्त्वाच्या योजनांना गती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.

मीन: मनःशांती लाभू शकते. रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होईल. आर्थिक व्यवहारांमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात.

धनु: उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळण्याबरोबरच कौटुंबिक संबंध जास्त घट्ट होण्याची शक्यता आहे.

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अनेकजण अशा भविष्यवाण्यांकडे आशेने पाहतात. पण कोणतेही निर्यण घेताना स्वतःचे मत, नियोजन आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांना प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे.

डिस्क्लेमर: वरील माहिती विविध सार्वजनिक स्रोतांमध्ये प्रसिद्ध झालेल्या ज्योतिषीय दाव्यांवर आधारित आहे. याच्या अचूकतेबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही. साम टिव्ही याच्याशी समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com