PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार? कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट

PM Kisan 24th Installment Date: पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. केंद्र सरकारने योजना २०३२ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यावर देशातले कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार?  कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट
PM Kisan Yojanameta ai
Published On

महाराष्ट्रात सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. पीएम किसान योजना त्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकींमध्ये या योजनेला २०३१ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे लागले आहे. याच संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे.

पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता कधी मिळणार? (PM Kisan 24th Installment)

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेतमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. हे टप्प्याटप्प्याने दिले जातात. म्हणजेच ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये पाठवले जातात. तर या योजनेचा मागचा हप्ता २० जून रोजी देण्यात आला होता. तर पुढील हप्ता हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार?  कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

मागील हप्त्यांचा अंदाच

जर तुम्ही मागच्या हप्त्यांबद्दल तपासणी केली तर, २१ वा हप्ता हा २० नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. त्याआधी १६ वा हप्ता ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पाठवण्यात आला होता. त्यामुळे यंदाही ५ ऑक्टोबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 24वा हप्ता कधी खात्यात येणार?  कॅबिनेट बैठकीतून समोर आली मोठी अपडेट
8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

शेतकऱ्यांना मिळालेले इतर लाभ

दरम्यान, पीएम किसान योजने अंतर्गत २३ व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली. २४ व्या हप्त्याअंतर्गत ९.४९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८,९८४ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली. कोरोनाच्या महामारीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना १.७१ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्यात आली. या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना १.०६ लाख कोटी रुपयांपेक्षआ जास्त मदत मिळाली असून, अंदाचे प्रत्येक चार लाभार्थ्यांपैकी एक महिला शेतकरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com