Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

Maharashtra Government Women Scheme : लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच जुलैच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanameta ai
Published On

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या अपा लाभार्थ्यांच्या विरोधात कारवाईला वेग आलेला आहे. सरकारकडून केलेल्या ऑडिट आणि डेटा पडताळणीमध्ये अनेक अपात्र लाभार्थी समोर आल्याची माहिती मिळाली आहे. यात टॅक्स भरणारे, सरकारी कर्मचारी तसेच चुकीची देऊन किंवा पात्रता लपवून योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना तुरुंगवासाची वासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

अपात्र लाभ घेण्यांवर कोणती कारवाई होणार?

सरकारने स्पष्ट केलं की, पात्रता नसतानाही लाडकी बहीण योजनेचा दरमहिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा होत होता. मात्र असा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांकडून अथवा काही पुरुषांकडून परत वसूली केली जाऊ शकते. तसेच चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याच्या प्रकरणांमध्ये लागू असलेल्या कायद्यांनुसार कायदेशीर होऊ शकते. अशा कारवाईचे स्वरूप प्रत्येत प्रकरणातल्या तथ्यांवर अवलंबून असेल.

Ladki Bahin Yojana
8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

लाडकींचा महिलांना होणारा फायदा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० आर्थिक मदत दिली जाते. याचा फायदा महिलांना घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करतात. नुकताच जून महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता महिलांना जुलै महिन्याच्या हप्त्याची वाढ पाहतायेत.

Ladki Bahin Yojana
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ₹४,००० जमा होणार? नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; पाहा ताजी अपडेट

पुढील हप्ता कधी जमा होणार?

सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. याआधीही बरेच हप्ते याच दिवसांमध्ये महिलांच्या खात्यावर पाठवले होते. दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे काही महिलांमध्ये २०२५४ प्रमाणे दोन महिन्यांचे ३००० एकत्र मिळतील का? याबद्दल उत्सुकता आहे. पण याबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com