8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Government Employees Data Submission Deadline : आठव्या वेतन आयोगासाठी गरजेची माहिती सादर करण्याची मुदत आता संपली आहे. पुढे आयोग प्राप्त डेटाचे विश्लेषण करून पगारात, डीए, HRA आणि बाकीच्या भत्यांबद्दल शिफारशी तयार करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहे.
8th Pay Commission
8th Pay Commissionmeta ai
Published On

सध्या आठव्या वेतन आयोगाबद्दल कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहेत. आयोगाच्या कामकाजातला एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. केंद्रीय मंत्रालय, विविध सरकारी विभाग आणि केंद्रशासित प्रदेशांकडून महत्त्वाची माहिती सादर करण्याची शेवटची मुदत ३१ जुलै रोजी संपली. याआधी ही मुदत ३० जूनपर्यंत होती. मात्र अनेक विभागांनी जास्त वेळ मागितल्यामुळे ती वाढवून ३१ जुलैपर्यंत केली होती. आता ही मुदत संपल्यामुळे नव्याने कोणताही डेटा आयोगाच्या पोर्टलवर अपलोड करता येणार नाही.

आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी (8th Pay Commission Update)

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर दिल्लीपासून ते तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी कर्मचारी संघटना, सरकारी प्रतिनिधी आणि संबंधित विभागांसोबत बऱ्याच बैठका घेण्यात आल्या. त्यात कर्मचाऱ्यांनी पगार वाढ, महागाई भत्ता(DA), घरभाडे भत्ता (HRA), इतर भत्ते, सेवा अटीस रजा आणि कामाच्या पद्धीतीमध्ये सुधारणा यासंदर्भातल्या मागण्या आयोगासमोर मांडल्या आहेत. कर्मचारी संघटनांनी बदलत्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सॅलरीच्या रचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

8th Pay Commission
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाला लाडक्या बहि‍णींना मिळणार एकत्रित ३००० रुपये? मोठी अपडेट समोर

डेटा जमा करण्याची प्रोसेस (8th Pay Commission Data Submission)

डेटा जमा करण्याची प्रोसेस ही फक्त औपचारिकता नाही तर आयोगाच्या अंतिम शिफारशींचा पाया मानली जाते. मंत्रालये आणि विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारवर येणारा आर्थिक भार, कर्मचाऱ्यांची संख्या, पेन्शनधारकांची माहिती आणि वेतनवाढीचा संभाव्य परिणाम यांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. या माहितीच्या मदतीने आयोग पुढचे अहवाल तयार करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करेल.

8th Pay Commission
Night Mopping : रात्री घरात लादी पुसणं योग्य की अयोग्य? स्वच्छता तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा...

सॅलरीत कधी वाढ होणार?

डेटा सादर करण्याची मुदत संपली म्हणजे लगेचच सॅलरीत वाढ होत नाही. आता आयोग मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करेल, कर्मचारी संघटनांच्या मागण्यांचा अभ्यास करेल आणि त्यानंतर सरकारला आपल्या शिफारशी सादर करेल. त्यावर केंद्र सरकार निर्णय घेतल्यानंतरच आठव्या वेतन लागू आणि संभाव्य सॅलरीवाढीबद्दल स्पष्ट चित्र समोर येईल. त्यामुळे सध्या ही प्रोसेस पुढच्या टप्प्यात पोहोचली आहे. पण कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जास्त काळ वाट पाहावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com