

गेल्या काही दिवसांपासून आठव्या वेतन आयोबाद्दलच्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याच संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयोगाच्या स्थापनेला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ९ महिने पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनवाढीच्या शिफारशींसाठी आठवा वेतन आयोगाची स्थापना केली होती.
सध्या सर्वात जास्त चर्चा फिटमेंट फॅक्टरवर सुरू आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारेच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत किती वाढ होणार हे ठरणार आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आयोगाने अजून याबाबत कोणताही अंतिम निर्णय किंवा घोषणा केलेली नाही.
आयोगाने आगामी बैठकींचे वेळापत्रकही जाहीर केलं आहे. दिल्लीमध्ये ऑगस्ट महिन्यात ७ आणि १० ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये ७ आणि ८ सप्टेंबरला, पुडुचेरीमध्ये ९ सप्टेंबरला आणि चंदीगडमध्ये १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान बैठक आयोजित करण्यात आली आहे. चंदीगड बैठकीत सहभागी व्हायची इच्छा असणाऱ्यांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
फिटमेंट फॅक्टरसोबतच घरभाडे भत्ता (HRA) वाढवण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे. सध्याचा HRA अपुरा असल्याचे त्यांचे मत असून प्रवास भत्त्यात (Travel Allowance) वाढ करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सध्या ३ असलेला फॅमिली युनिटचा निकष ४.८ करण्याचा प्रस्ताव संघटनांनी मांडला आहे. यामध्ये आई-वडिलांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच महागाई भत्ता (DA)२५ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर तो बेसिक सॅलरीत एकत्र करण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ६० टक्के महागाई भत्ता मिळत असून अलीकडेच त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आयोगाच्या आगामी बैठकींमध्ये या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता असून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष आता आयोगाच्या अंतिम शिफारशींकडे लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.