Sakshi Sunil Jadhav
किडनी दररोज रक्त शुद्ध करते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि पाणी व क्षारांचे संतुलन राखते.
सतत वाढलेला BP किडनीतील लहान रक्तवाहिन्यांवर जास्त ताण निर्माण करतो. त्यामुळे त्या कठीण आणि कमकुवत होतात.
उच्च रक्तदाब आणि किडनीचे नुकसान सुरुवातीच्या टप्प्यात शांतपणे वाढत राहतं. सूज,थकवा, किंवा लघवीतही बदल दिसतो.
उच्च रक्तदाबामुळे किडनी खराब होते आणि खराब झालेली किडनी परत ब्लड प्रेशर वाढवते.
रक्तवाहिन्या खराब झाल्याने किडनीला पुरेसे ऑक्सिजन व पोषकद्रव्यांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शरीरीत विषारी पदार्थ जास्त द्रव साचू लागतात.
किडनी ब्लड प्रेशर नियंत्रित करणारे रेनिनसारखे हार्मोन्स तयार करते. किडनी खराब झाल्याने या हार्मोन्सचे संतुलन बिघडून ब्लड प्रेशर आणखी वाढतो.
किडनीचे कार्य कमी झाल्याने शरीरात जास्त मीठ आणि पाणी साचते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका जास्त होतो.
रक्तदाब नियमित तपासणे, संतुलित आहार, मीठ कमी खाणे, व्यायाम करणे, धूम्रपान टाळणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास किडनीचे नुकसान टाळता येऊ शकते. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.