SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

South Africa T20 League: SA20 च्या पाचव्या हंगामापूर्वी सर्व फ्रँचायझींनी रिटेन आणि नव्याने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. मिचेल मार्श, जो रूट, सॅम करन आणि फिल सॉल्ट यांसारख्या स्टार खेळाडूंच्या बदल्यांमुळे ७ ऑक्टोबरच्या लिलावाची उत्सुकता अधिक वाढली आहे.
SA20 Season 5
SA20 Season 5saam tv
Published On

दक्षिण आफ्रिकेतील टी-20 क्रिकेट स्पर्धा SA20 चा पाचवा सिझन आणखी रंगतदार होणार आहे. आगामी सिझनसाठी सर्व सहा फ्रँचायझींनी ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या आणि नव्याने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीये. यंदाचा लिलाव 7 ऑक्टोबर रोजी होणार असून त्याआधी चार टीम्समध्ये मिळून अजून 19 जागा रिक्त आहेत. तर डर्बन्स सुपर जायंट्स आणि पार्ल रॉयल्स या दोन टीम्सने 19 खेळाडूंसह टीम पूर्ण केलीये.

तीन वेळा SA20 विजेते ठरलेल्या सनरायझर्स ईस्टर्न केप टीमने ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार मिचेल मार्श याला संघात स्थान दिलंय. त्यामुळे तो प्रथमच SA20 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. सध्या 'द हंड्रेड' स्पर्धेत सनरायझर्स समूहाच्या लीड्स टीमकडून खेळणारा मार्श आता क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रीट्झके, जॉर्डन हर्मन आणि कर्णधार ट्रिस्टन स्टब्स यांच्यासोबत संघाच्या फलंदाजीला अधिक बळ देणार आहे.

SA20 Season 5
Rohit Sharma: रोहित शर्मा आणि गौतम गंभीरमध्ये All Is Well? लॉर्ड्सच्या बाल्कनीत व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

दरम्यान पहिल्या दोन सिझनमध्ये MI केपटाऊनचं प्रतिनिधित्व करणारा इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आता डर्बन्स सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. या टीममध्ये त्याच्यासोबत इंग्लंडचाच अनुभवी विकेटकीपर-फलंदाज जॉस बटलर देखील आहे.

इंग्लंडचा टेस्ट टीमचा कर्णधार जो रूट पुन्हा एकदा पार्ल रॉयल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. काही सिझनपूर्वी त्याने युवा फलंदाज लुआन-द्रे प्रिटोरियससोबत दमदार ओपनिंग पार्टनरशिप करत टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. आता तो पुन्हा एकदा गुलाबी जर्सीत मैदानात उतरणार आहे.

मागील सिझनमधील उपविजेता प्रिटोरिया कॅपिटल्सनेही आपली फलंदाजी अधिक मजबूत केलीये. टीममध्ये इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा मॅट शॉर्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या 'द हंड्रेड' स्पर्धेत वेल्श फायरकडून ओपनिंगला खेळणारी ही जोडी आता प्रिटोरियासाठीही डावाची सुरुवात करणार आहे. त्यांच्यासोबत डेवाल्ड ब्रेविस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल आणि मागील सिधनमध्ये चमकलेला कॉनर एस्टरहुईझेन असे दमदार फलंदाजही टीममध्ये आहेत.

गेल्या तीन सिझनमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्ससाठी प्रभावी कामगिरी करणारा इंग्लंडचा ऑलराऊंडर विल जॅक्स आता MI केपटाऊनमध्ये दाखल झाला आहे. तो याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि सध्या 'द हंड्रेड'मध्ये MI लंडनकडून खेळत आहे. त्यामुळे आता तो मुंबई इंडियन्स समूहातील तिसऱ्या संघाचाही भाग बनला आहे.

SA20 Season 5
Rohit Sharma update : रोहित शर्मा वनडेमधून रिटायर होणार का? बीसीसीआयचा हिटमॅनच्या कोर्टात चेंडू, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

SA20 लीगचे आयुक्त ग्रेम स्मिथ यांनी सांगितले की, "पाचवा सिझन आतापर्यंतचा सर्वात दमदार ठरणार आहे. मिचेल मार्शसारखा दर्जेदार खेळाडू तसंच जो रूट, सॅम करन आणि फिल सॉल्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्सचा सहभाग ही लीग जगभरातील खेळाडूंना आकर्षित करते. लिलावापूर्वीच बहुतांश टीम्सने आपली मुख्य खेळाडूंची फळी निश्चित केलीये. यावरून लीगमध्ये सातत्य आणि स्थिरता निर्माण झाल्याचे दिसून येतं. त्यामुळे यंदाचा सिझन अधिक चुरशीचा होणार आहे."

दुसरीकडे मेजर लीग क्रिकेट (MLC) विजेता कर्णधार जेसन होल्डर आता जोहान्सबर्ग सुपर किंग्सकडून खेळणार आहे. पहिल्या चार सिझनमध्ये टीमचं नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला टीमने रिलीज केल्यामुळे सुपर किंग्सला आता नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे. टीम्सने रिलीज केलेल्या मोठ्या नावांमध्ये इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जॉनी बेअरस्टोचाही समावेश आहे.

SA20 Season 5
Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

याशिवाय MI केपटाऊनने टीमचा भाग असलेला ट्रेंट बोल्ट, रासी व्हॅन डर डुसेन आणि कायरन पोलार्ड यांना टीममधून रिलीज केलं आहे. तर जोहान्सबर्ग सुपर किंग्सने करारबद्ध केलेले वियान मुल्डर आणि नांद्रे बर्गर हे खेळाडूदेखील आता लिलावात उपलब्ध असतील. आगामी लिलावात जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि MI केपटाऊन या दोन टीम्सवर सर्वाधिक जबाबदारी असेल. सुपर किंग्सला अजून सात खेळाडूंची, तर MI केपटाऊनला सहा खेळाडूंची गरज आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सकडे पाच जागा रिक्त आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com