Mumbai Rain Alert : मुंबईला पावसाचा तडाखा, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Rain Latest Update Yellow Alert For Next 48 Hours: मुंबईत मुसळधार पावसाची अनेक ठिकाणी नोंद झालीय. नागरिकांनी पावसाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन प्रशासनाने केलंय.
रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Local TrainSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईत पावसाचा जोर वाढलाय. मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस, तर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाल्याचं समोर आलंय. मुंबई उपनगरात सकाळी पाच वाजेपर्यंत १३१.२ मिलिमीटर पावसाची नोंद, तर मुंबई शहरात ७७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. मुंबईतही आजही राहणार पावसाचा जोर कायम राहणार आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

रेल्वेची वाहतूक विस्कळीत

प्रभादेवी आणि दादर दरम्यान झाड कोसळल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर पिंपळाचं झाड कोसळलं होतं. ही घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. ऐन रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने धिम्या मार्गावरील लोकलला जवळपास तासभर खोळंबा झाला होता. जवळपास तासाभराच्या रखडपट्टीनंतर बोरिवलीच्या दिशेने धिम्या मार्गावरील गाड्या सुरू झाल्यात.

अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबईतही आजही पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईत येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील ४८ तास मुंबईत चांगला पाऊस (Mumbai Rain) अपेक्षित आहे. कोकणात आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.रायगडमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.

दादर प्रभादेवीदरम्यान रेल्वे रूळावर झाड कोसळल्याची घटना (Mumbai Rain Latest Update) घडली. त्यामुळे विरारकडे जाणाऱ्या लोकल थांबल्या होत्या. सकाळी साडेपाचवाजेपर्यंत दहिसरमध्ये १७१ मिमी, मुंबई एयरपोर्टमध्ये ११२ मिमी, राम मंदिरपरिसरात १५१ मिमी,टाटा पॉवर (चेंबूर)मध्ये ५१ मिमी, विक्रोलीत १३१.५ मिमी, भायखला ६५.५ मिमी, महालक्ष्मी २७.५ मिमी, माटुंगा ७१.५ मिमी, सायनमध्ये ८१. २ मिमी पावसाची नोंद झालीय.

रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Mumbai Rain: मुंबईसह, पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस; लोकल सेवा धीम्या गतीने, प्रवाशांची मोठी तारांबळ VIDEO

ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट

काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात आज ऑरेंज अलर्ट, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज (Local Train Update) आहे. मागील २४ तासात ठाणे शहरात १२० मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला (Rain Update) गेलाय.

रेल्वेची वाहतूक विस्कळीत
IMD Rain Alert : पालघर, रायगड, ठाण्यात मुसळधार पावसासह ५५ किमी वेगाने वाहणार वारे; समुद्राला भरती, ३.२४ मीटर उंचीच्या उसळणार लाटा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com