Mumbai Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली, किती टक्के पाणीसाठा?

Priya More

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या आठ दिवसांमध्ये धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे ही धरणं काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा जमा झाला हे आपण पाहणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,१९,२७६ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९८.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १३,०८,२०८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९०.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा ८ टक्क्यांनी वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या दोन महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. आतासुद्धा धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो. या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९८.०९ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.५८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९७.५४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९७.४४ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT