Mumbai Dam Water Level: टेन्शन खल्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा ओव्हर फ्लो, इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा?

Tansa, Bhatsa, Vaitarna Dam Water Level Status: मुंबईला पाणीपुरवठा करणारं दुसरं जलाशय भरलं आहे. ठाणे जिल्ह्यातील तानसा धरण ओव्हर फ्लो झालं आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Dam Water Level: टेन्शन खल्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा ओव्हर फ्लो, इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा?
Tansa Dam Overflow Saam TV
Published On

फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

शहापूर : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी २ जलाशय १०० टक्के भरले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारं दुसरं जलाशय भरल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तानसा धरण भरल्यानंतर नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, ठाण्यासह धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसाचा नागरिकांना मोठा फटका बसताना दिसत आहे. लोकल सेवेसहित रस्ते वाहतूकीवरही पावसाचा परिणाम पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशय परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलावानंतर तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची काही प्रमाणात पाणीचिंता मिटली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण आज बुधवारी सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटंना ओव्हर फ्लो झालं. त्यामुळे तानसा धरणाचे ३ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामधून ३३१५ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे या नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर , तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा एकूण सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांपैकी तुळशी तलाव, तानसा धरण भरलं आहे. मोडक सागर, विहार धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. शहराला पाणीपुरवठा करणारं दुसरं धरण भरल्याने १० टक्के पाणीकपात रद्द करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Dam Water Level: टेन्शन खल्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा ओव्हर फ्लो, इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा?
Mumbai Tulsi lake Overflow : गुड न्यूज! मुंबईकरांना मोठा पाणीदिलासा; शहराला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव ओव्हर फ्लो

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा -

  • - अप्पर वैतरणा - २५.४० टक्के पाणीसाठा

  • - मोडक सागर - ८२.९८ टक्के पाणीसाठा

  • - तानसा - १०० टक्के पाणीसाठा

  • - मध्य वैतरणा - ५३.०१ टक्के पाणीसाठा

  • - भातसा - ५५.६८ टक्के पाणीसाठा

  • - विहार - ९३.१४ टक्के पाणीसाठा

  • - तुळशी - १०० टक्के पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com