MHADA Lottery : तारीख ठरली! म्हाडाच्या २,०३० घरांसाठी पुढील महिन्यात सोडत, मुंबई मंडळाचं वेळापत्रक जाहीर

MHADA Lottery for 2030 houses : म्हाडाच्या २,०३० घरांसाठी ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाने सोडतीचं वेळापत्रक जाहीर केलंय.
म्हाडाच्या २,०३० घरांसाठी पुढील महिन्यात सोडत
Mhada House Saam TV
Published On

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या सोडतीच्या निकालाची तारीख अखेर समोर आलीय. १ ऑक्टोबर रोजी सोडत काढली जाईल, हे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलंय. येत्या ८ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबई मंडळाने २०३० घरांसाठी ही सोडत काढलेली आहे.

म्हाडाच्या २,०३० घरांसाठी सोडत

मुंबई मंडळाने २०३० घरांसाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध (MHADA Lottery) केली होती. त्यानंतर ९ ऑगस्टपासुन घरांच्या विक्री स्विकृतीला सुरूवात केली होती. ४ सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर सोडत १३ सप्टेंबर रोजी काढणार असं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु काहीतरी कारणामुळे १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली (MHADA Lottery Date) होती. त्यामुळे सोडत आणखीनच लांबणीवर पडली होती.

मुंबई मंडळाचं सोडतीचे वेळापत्रक

नवीन वेळापत्रकानुसार आता पात्र अर्जदारांची अंतिम यादी (MHADA Lottery for 2030 houses) म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहामध्ये सोडतीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मिळतेय.

म्हाडाच्या २,०३० घरांसाठी पुढील महिन्यात सोडत
MHADA: डबल धमाका! म्हाडा लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी, नोंदणीची मुदतही वाढवली

घरासाठी किती मोजावी लागणार किंमत?

यासंदर्भात संकेतस्थळावर गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा म्हाडाने हे वेळापत्रक प्रसिद्ध (mhada Mumbai mandal announcement of lottery) केलंय. या वेळापत्रकानुसार ८ ऑक्टोबर रोजी आता सोडत जाहीर होणार आहे. संगणकीय पद्धतीने सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वाजून ५९ मिनिटे आहे. या सोडतीमध्ये २०३३ घरांच्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०० ते चारशे फुटाचे ३५९ घरं आहेत. या गटातील घरासाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आलीय.

म्हाडाच्या २,०३० घरांसाठी पुढील महिन्यात सोडत
Pune Mhada Lottery 2024 : घरासाठी म्हाडा लॉटरीचा फॉर्म कसा भरायचा? वाचा एका क्लिकवर पात्रता आणि अटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com