MHADA: डबल धमाका! म्हाडा लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी, नोंदणीची मुदतही वाढवली

MHADA: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास आणि प्राधिकरणाने परवडणाऱ्या घरांच्या किमती 10% ते 25% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
MHADA: डबल धमाका! म्हाडा लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी, नोंदणीची मुदतही वाढवली
MHADA Saam TV
Published On

मुंबई म्हाडा कडून 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या 2030 घरांपैकी 370 घरे ही म्हाडाला 33 (5);आणि 33 (7) विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासकांकडून मिळाली आहेत. ही सर्व घरे मुंबईतील ताडदेव, जुहू, विक्रोळी, माजगाव,कुर्ला, डी एन नगर,बोरिवली या भागात आहेत मात्र या घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. म्हाडाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाल्यापासून कालपर्यंत 30000 अर्ज प्राप्त झाले आहेत.

घरांच्या किमती पाहता घरांना मिळालेला प्रतिसाद हा अल्प असल्यामुळे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरांच्या किमती दहा टक्के ते 25 टक्के इतक्या कमी होणार आहे. मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या या लॉटरीसोबतच भविष्यात येणाऱ्या लॉटरींसाठी देखील हा निर्णय कायम राहणार असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई म्हाडाकडून मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. 9 ऑगस्ट दुपारी बारा वाजले पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र घरांच्या किमती प्रचंड महागात असल्यास संदर्भात साम टिव्ही ने अनेकदा बातम्या केल्या होत्या. यानंतर म्हाडाकडून घरांच्या किमती कमी केल्या जाण्याबाबत चर्चा देखील सुरू झाली होती.

आज म्हाडा भवनातील गुलझारीलाल नंदा सभागृहात म्हाडा शुभंकर चिन्हाचे अनावरण गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावे यांनी सामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेत 33 5 आणि 33 7 विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घराच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. आता म्हाडा ने जाहीर केलेल्या लॉटरीतील घारांसोबत भविष्यातील लॉटरीसाठी देखील हा निर्णय लागू होईल असे सावे यांनी स्पष्ट केले.

MHADA: डबल धमाका! म्हाडा लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी, नोंदणीची मुदतही वाढवली
Mhada Lottery 2024 : मुंबईतील २०३० घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल होणार, प्रकल्पातून होणारी कमाई किती? वाचा

नागरिकांकडून म्हाडाला अनेकदा घरांच्या किमती संदर्भात तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या लोकशाही दिन जनता दरबार च्या माध्यमातून घरांच्या किमती संदर्भात सातत्याने नागरिकांकडून तक्रारी येत होत्या यानंतर आता मंत्री असावे यांनी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे 33 (5) आणि 33 (7) विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत विकासाकाकडून मिळालेल्या घरांच्या किमती कमी करताना त्या इमारतीचा थकीत मेंटेनन्स आता स्वतः भरणार आहे घराचा ताबा दिल्यापासून चा मेंटेनन्स मात्र घर लागणाऱ्या व्यक्तीलाच भरावा लागणार आहे.

33(5) पाच आणि 33 (7) नुसार म्हाडाला एकूण 370 घरे मिळाली यापैकी विक्रोळी येथील अत्यल्प गटासाठी असलेल्या 2 घरांच्या किमती या 38 ते 42 लाख पर्यंत होत्या मात्र आता यात 25% किंमत कमी केली जाणार आहे. अल्प गटासाठी माझगाव येथे तीन घरे उपलब्ध असून यांची किमान एक कोटी 37 लाख इतकी निश्चित करण्यात आली होती मात्र यात देखील 20% किंमत कमी केली जाणार आहे.

अल्पगटासाठी कुर्ला येथे 14 घरे उपलब्ध असून येथील घराची किंमत 43 लाख इतकी निश्चित करण्यात आली होती मात्र आता यात 20 टक्के किंमत कमी करून ही घरे सोडतील दिली जाणार आहेत. अल्पगटासाठी बोरिवली येथे दहा घरे उपलब्ध आहेत यांच्या किमती देखील एक कोटी 25 लाखाच्या आसपास आहेत मात्र आता यात 20 टक्के किंमत कमी केली जाणार आहे. अंधेरी परिसरात अल्प गटासाठी आठ घरे उपलब्ध असून त्यांच्या किमती एक कोटी 46 लाखाच्या आसपास आहेत आता यात 20 टक्क्याची कपात केली जाणार आहे. सांताक्रुज परिसरात अल्पगटासाठी 16 घरे उपलब्ध असून किमत 72 लाखांच्या आसपास असून आता 20 टक्के किंमत कमी होणार आहे. कमी करण्यात आलेल्या किमती या फक्त 33 (5)आणि 33 (7) मधून मिळालेल्या 370 घरांसाठीच लागू राहणार आहेत.

MHADA: डबल धमाका! म्हाडा लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी, नोंदणीची मुदतही वाढवली
Mhada Lottery: म्हाडा लॉटरीकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ! आठ दिवसात फक्त ५४०३ अर्ज; अल्पप्रतिसादाचे नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com