Mhada Lottery 2024 : मुंबईतील २०३० घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल होणार, प्रकल्पातून होणारी कमाई किती? वाचा

Mhada income : मुंबईतील २०३० घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल होणार आहे. म्हाडा या प्रकल्पातून कोट्यवधींची कमाई होणार आहे. जाणून सर्व माहिती एका क्लिकवर
MHADA
MHADA Saam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या २०३० घरांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या घरांसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवारनगर-विक्रोळी, शिवधाम , मालाड या ठिकाणी असलेल्या एकूण २०३० घरांची जाहिरात काढण्यात आली आहे. या सर्व घरांच्या विक्रीतून म्हाडाला २१०० कोटी रुपये इतकी कमाई होणार आहे.

MHADA
Mumbai MHADA: मोठी बातमी! मुंबईकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाकडून २०३० घरांसाठीची सोडत जाहीर, अर्ज कधी, मुदत किती?

कोणत्या गटाला किती घरे?

मुंबई मंडळाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ६२९ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६७ घरे, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.या सोडतीत म्हाडाने बांधलेली १३२७ घरे, विविध विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा म्हणून म्हाडाला ३७० घरे मिळाली आहेत. मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ घरांचा देखील या २०३३ घरांचा समावेश आहे.

अर्जदारांना उद्या ९ ऑगस्टपासून दुपारी बारा वाजता ऑनलाईन पद्धतीने या घरांसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. यानंतर अर्जांची छाननी १३ सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. सोडतीत विजेत्या ठरलेल्यांना कागदपत्रांची पूर्तता करून म्हाडाला 100% रक्कम देऊन घराचा ताबा घेता येणार आहे.

मुंबई म्हाडा मंडळाच्या या २०३३ घरांच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०० ते चारशे फुटाचे ३५९ घरे आहेत. तसेच या गटातील घरासाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी साडेचारशे ते सहाशे फुटाच्या ६२७ घरे आहे. या गटातील घरासाठी सुमारे ५० लाख ते दीड कोटीपर्यंत किंमत निश्चित केली आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी 600 ते 900 फुटाचे एकूण ७६८ घरे उपलब्ध आहेत.

MHADA
Mhada Lottery New Rules : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने नियमात केला महत्वपूर्ण बदल, वाचा सविस्तर

या गटातील घरासाठी ७६ लाख ते दोन कोटी रुपये इतके मोजावे लागणार आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी ९०० ते बाराशे फुटाच्या एकूण २७६ घरे उपलब्ध आहेत. या गटातील घरासाठी किमान सव्वा कोटी ते कमाल साडेसात कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या २०३३ घरांच्या सोडतीतून विजेत्यांनी पैसे भरून घराचा ताबा घेतल्यानंतर म्हाडा तब्बल २१०० कोटी रुपये कमावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com