Mhada Lottery : दोन दिवसांत म्हाडा करणार धमाका! ११ हजार घरांसाठी काढणार लॉटरी

Mhada Houses In Mumbai Konkan Division: मुंबई कोकण विभागात घरांसाठी म्हाडा लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. ही जाहिरात ११ हजार घरांसाठी असणार आहे.
म्हाडा लॉटरी
Mhada LotterySaam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही मुंबई

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे घरांच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला मुंबईसारखं शहरात घरं विकत घेणं खूप कठीण झालंय. आपलं हक्काचं घर असावं, हे साधारण प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशा लोकांसाठी खुशखबर आहे, कारण म्हाडा मुंबई कोकण विभागात ११ हजार घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्यांना मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांत घरं हवंय, अशा नागरिकांचं स्वप्न आता पूर्ण होणार ((Mhada Houses In Mumbai) आहे.

म्हाडा लॉटरी

मुंबई आणि कोकण विभागातील नागरिकांचे घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाकडून प्रथमच मुंबई आणि कोकण विभागासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची जाहिरात काढली जाणार (Mhada Lottery) आहे. मुंबईत दोन हजारांसाठी तर कोकण मंडळाकडून तब्बल ९ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. यामुळे मुंबईसह कोकण विभागातील तब्बल अकरा हजार नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे.

मुंबई कोकण विभागात घरं

विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या (Mumbai News) आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हाडा प्रत्येक वर्षी विविध भागांमध्ये लॉटरी काढत असते. त्यानुसार म्हाडाने यंदाही लॉटरी काढली आहे. मुंबईत तब्बल दोन हजार तर कोकण मंडळासाठी देखील ९ हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी म्हाडा करत आहे.

म्हाडा लॉटरी
Pune Mhada Lottery 2024 : घरासाठी म्हाडा लॉटरीचा फॉर्म कसा भरायचा? वाचा एका क्लिकवर पात्रता आणि अटी

घरांसाठी म्हाडांची जाहिरात

म्हाडाच्या घरांची जाहिरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच काढण्यात येणार असल्याचं समोर आलंय. घरांची संपूर्ण प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याचं म्हाडाने नियोजन केल्याची माहिती (Mhada Houses In Konkan Division) मिळते. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांतच म्हाडाच्या घरांची सोडतीची जाहिरात काढण्यात येणार आहे, तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजे सप्टेंबर महिन्यात सोडत काढण्यात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच नागरिकांना घराचा ताबा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

म्हाडा लॉटरी
Mhada Lottery: म्हाडा मुंबईकरांसाठी काढणार ६००घरांची लॉटरी? कधी निघणार सोडत?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com