Viral Video: वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स! मुंबई लोकलमधील VIDEO तुफान व्हायरल -VIDEO

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमध्ये वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर काही तरुणींनी भन्नाट डान्स केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video: वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स! मुंबई लोकलमधील VIDEO तुफान व्हायरल -VIDEO
viral videoinstagram
Published On

मनोरंजन म्हणजे सोशल मीडिया. आधी लोकांना मनोरंजन हवं असायचं त्यावेळी ते टीव्ही लावून एखादा कार्यक्रम पाहत बसायचे. मात्र आता मोबाईल हातात घेतला की, सर्च करून हवं ते पाहता येतं. त्यात रिल्स स्टार्स म्हणजे मेजवानीच. आपल्या फॉलोवर्सचं मनोरंजन करण्यासाठी ते कुठल्या थराला जातील याचा काही नेम नसतो. नुकताच मुंबई लोकलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात धावत्या लोकलमध्ये तरुणी डान्स करताना दिसून येत आहेत. (Mumbai local Viral Video)

Viral Video: वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स! मुंबई लोकलमधील VIDEO तुफान व्हायरल -VIDEO
Viral Video : नादच खुळा! हलगीच्या तालावर आजी आजोबांनी धरला ठेका; उत्साह पाहून तुम्हीही म्हणाल...

मुंबई लोकल म्हटलं तर आपल्याला लाखो लोकांची गर्दी आठवते, धक्काबुक्की करत प्रवास करत असलेले प्रवासी आठवतात. याउलट महिलांच्या डब्यात भलतच काहीतरी सुरू असतात. सोशल मीडियावर यापूर्वी अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात महिला भाजी निवडताना किंवा धक्काबुक्की करताना दिसून आले आहेत. मात्र आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरुणी वाटाण्याचा गोल दाणा या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.

Viral Video: वाटाण्याचा गोल दाणा गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स! मुंबई लोकलमधील VIDEO तुफान व्हायरल -VIDEO
Viral Video : भयंकर! नदीकाठी स्टंट करणं अगंलट; उडी मारताना तरुणाचा तोल गेला अन्...पाहा थरारक VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे. काही तरुणी महिलांच्या डब्यात डान्स करताना दिसून येत आहेत. नेहमी गर्दी आलेली मुंबई लोकल रिकामी कशी? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. तर हा व्हिडिओ रात्रीच्या वेळी शूट केला गेला असावा. त्यामुळे लोकल रिकामी असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर वाटण्याचा गोल दाणा हे गाणं तुफान गाजतंय. या गाण्यावर काही तरुणी ग्रूप डान्स करताना दिसून येत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ७ मुली भन्नाट डान्स करत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला हा व्हिडिओ _pluviophilic_ या सोशल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवर आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com