Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार सुसाट, दोन नव्या मार्गिका तयार होणार; लोकलची संख्याही वाढणार!

Western Railway Latest News : तुम्ही जर पश्चिम रेल्वेमार्गावरून नियमित प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे.
Western Railway Latest News
Western Railway Latest NewsSaam TV
Published On

तुम्ही जर पश्चिम रेल्वेमार्गावरून नियमित प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बोरिवली ते विरारदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे. नव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार असून प्रदूषण देखील कमी होणार आहे.

Western Railway Latest News
Mumbai Local Train : लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल होणार, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा होणार!

याशिवाय 26 किमी लांबीच्या या मार्गामुळे लोकलची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दीतून मुक्तता होणारा आहे. मात्र, या मार्गिकेत अडथळा ठरणारी तब्बल 2 हजार 612 तिवरांची झाडं तोडण्यात येणार आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी नाराज होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मार्गिकेला परवानगी देताना इंधनाची बचत होत प्रदूषणाला आळा बसेल, असं निरीक्षण देखील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे.

सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान 5 मार्गिका आहेत आणि सहाव्या मार्गाचं काम सुरू आहे. एमयूटीपी अंतर्गत बोरिवली आणि विरार दरम्यान पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग 2 हजार 184 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. मात्र, या प्रकल्पाच्या आड कांदळवन येत असल्यानं ती तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारी याचिका पश्चिम रेल्वेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

यावर काही दिवसांपूर्वी सुनावणी देखील पार पडली होती. मात्र, या सुनावणीचा निकाल गुरुवारी (ता. 5) देण्यात आला. निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला तब्बल 2 हजार 612 तिवरांची झाडं तोडण्यास परवानगी दिली. नव्या मार्गिकांमुळे वेळेची बचत तर होणारच पण प्रदूषणही कमी होईल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं.

पश्चिम रेल्वेमार्गावर 10 तासांचा जंबो ब्लॉक

दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले असून या कामासाठी तब्बल 10 तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून हा ब्लॉक घेतला जाणार असून 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, प्रवाशांना मोठा अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

Western Railway Latest News
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात कसं असेल हवामान? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com