भारताने एशिया कप २०२५ फाइनलमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेणं टीम इंडियाने नाकारले.
टीम इंडियाच्या या कृत्यावरून संजय राऊत चांगलेच संतप्त झाले आहेत.
संजय राऊत यांनी दुबईतील हस्तांदोलनाचा व्हिडीओ शेअर करून टीमवर जोरदार निशाणा साधला.
एशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. विजयानंतर टीम इंडियाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत संतापले असून त्यांनी दुबईमधील एक व्हिडीओ शेअर करत टीम इंडियाला सवाल केला आहे. १५ दिवसांपूर्वी मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले, आता नौटंकी का करता?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसोबत सामना खेळल्यामुळे त्यांनी राग व्यक्त केला.
संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन करतानाचा सूर्यकुमार यादवचा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, सीरीजच्या सुरूवातीला म्हणजे १५ दिवसांपूर्वी पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवीसोबत हस्तांदोलन केले. फोटो काढले. आता हे लोक देशाला नौटंकी दाखवत आहेत. ऐवढी राष्ट्रभक्ती तुमच्या रक्तात असती तर तुम्ही पाकिस्तानसोबत मैदानात उतरलेच नसता. वरपासून खालपर्यंत सगळीकडे ड्रामाच आहेत. भारताची जनता मूर्ख नाही आहे.'
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये देखील टीम इंडियाला खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, 'ही सगळी नौटंकी आहे. मुळात ते हा सामना का खेळले. हा देशाचा त्यांना सवाल आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून त्यांनी पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या रक्ताचा अपमान केला. त्यामुळे ही सर्व नौटंकी आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये ही देशातील जनतेची भावना होती. देशातील नागरिकांनी आणि देशभक्तांनी हा सामना पाहिला नाही. अनेक ठिकाणी हा सामान दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण जनतेने तो हाणून पाडला.'
'हस्तांदोलन न करणे, चषक न स्वीकारणे ही नौटंकी आहे. ते सामान तर खेळले ना. अशा गोष्टी करून ते देशाला मूर्ख बनवत आहेत का? त्यांनी पंतप्रधान मोदींकडून देशाला मूर्ख बनवण्याची प्रेरणा घेतली आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच, हा ढोंगीपणा देशासमोर आला पाहिजे. आता ते विजयाची रक्कम सैन्याला देण्याची घोषणा करत आहेत. पण त्यांनी विजयाची रक्कम देण्यापेक्षा पाकिस्तानसोबत खेळवण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यातील सर्व खेळाडूंची रक्कम दान करावी, असे संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.