'पैशांचं सोंग आणता येत नाही तर..'; अजित पवारांच्या विधानावरून संजय राऊत संतापले, म्हणाले सरकार सोडा

Sanjay Raut slams Maharashtra government: राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी उद्ध्वस्त. अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत. संजय राऊतांकडून अजित पवार यांचा समाचार.
Sanjay Raut Slams Ajit Pawar
Sanjay Raut Slams Ajit PawarSaam
Published On
Summary
  • राज्यात पावसाचं महापूर.

  • सरकारनं जाहीर केलेली मदत अपुकी, शेतकरी नाराज.

  • संजय राऊतांकडून अजित पवारांवर निशाणा.

महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. राज्य सरकारमधील मंत्री कालपासून पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर आहेत. मात्र, सरकारने जाहीर केलेली मदत पुरेशी नसून, यामुळे शेतकरीवर्ग नाराज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काल धाराशिव दौऱ्यावर होते. आज ते बीड जिल्ह्यात आहेत. तरूणाच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले. 'सगळी सोंगं करता येतात, पैशांचं सौंग करता येत नाही', असं पवार म्हणाले होते. या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत अजित पवारांवर कडाडले.

लाडक्या बहिणीच्या आडून सरकार मदतीचा हात आखडता घेऊ शकत नाही, असं म्हणत राऊतांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेट दिली. शेतात आणि गावात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. या दौऱ्यावर संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Sanjay Raut Slams Ajit Pawar
ग्राहकांसाठी खूशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामध्ये ९,३०० रूपयांची घट, पाहा लेटेस्ट दर

'मराठवाड्याचं पाहणी दौरा फक्त दिखावा आहे. ३६ लाख शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या आक्रोशाला न्याय मिळाला आहे का? फक्त फोटोसेशन करून मदत होत नाही', असं राऊत म्हणाले. 'मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी दौऱ्यात नेमकं काय पाहिलं? पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून मदत होत नाही. मदत गुप्त असायला हवी', असं एकनाथ शिंदे यांच्या मदत कार्यावर राऊतांनी मत मांडलं.

राऊतांनी केंद्र सरकारवरही निशाणार साधला. 'महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने काय केलं? कोणतं पथक मदतीसाठी पाठवलं? शासन मुर्दाड आहे', असा जहरी टोलाही राऊतांनी लगावला.

Sanjay Raut Slams Ajit Pawar
कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

अजित पवारांनी केलेल्या, 'पैशाचं सोंग आणता येत नाही', या वक्तव्यावरून राऊतांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, 'पैशांचं सोंग आणता येत नाही, तर सरकार चालवू नका. यांच्या दरोडीखोरीमुळेच आज ही वेळ आली आहे', असा घणाघात राऊतांनी केला.

राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला. 'कोरोनाकाळात आम्ही आमदार खासदार एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिलं. पण भाजपनं पीएम केअर फंडमध्ये पैसे जमा केले. शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. पण निवडणुकांसाठी आहे', अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com