कोकणात राज ठाकरेंना डबल धक्का, वैभव खेडेकरनंतर आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर

Political Earthquake in Konkan: तळ कोकणात भाजपची ताकद वाढली. मनसे डबल धक्का. वैभव खेडेकरनंतर आणखी शिलेदार भाजपच्या गळाला लागला.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On
Summary
  • तळ कोकणात मनसे डबल धक्का.

  • भाजपची ताकद वाढली,

  • खेडेकरनंतर आणखी शिलेदार भाजपच्या वाटेवर.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळ कोकणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती तसेच महाआघाडीमध्ये इनकमिंग तसेच आऊटगोईंग सुरू आहे. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बडतर्फ केलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी हे देखील भाजप पक्षात जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार, मनसेनं वैभव खेडेकर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली होती. या निर्णयामुळे खेडेकर नाराज झाले होते. त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा भाजप कार्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Raj Thackeray
शिकवणीच्या नावाखाली शिक्षकानेच विद्यार्थिनीची अब्रू लुटली, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, मुलीचा मृत्यू

२२ तारखेला वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याची माहिती आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे आणि खासदार राणेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

याचवेळी माजी शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णीही भाजपसोबत जाणार असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अद्वैत कुलकर्णी काही काळ पक्षापासून दुरावले होते. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा राजकारणात सक्रीय होणार आहेत. कुलकर्णी लवकरच भाजप पक्षात जाणार असल्याची माहिती आहे.

Raj Thackeray
रायगडमध्ये अजित पवारांना धक्का! बडे नेते भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com