Team India Squad: बलाढ्य संघाचं आव्हान पेलण्यासाठी टीम इंडिया सज्ज; रोहित आणि विराटला संघात स्थान नाही

India vs Australia ODI Series Team India Squad: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
India Vs Australia Series
India Vs Australia Seriesgoogle
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेसाठी भारताच्या अ संघाची घोषणा केली आहे. तिन्ही एकदिवसीय सामने कानपूरमधील ग्रीन पार्क येथे खेळवले जातील. ही मालिका ३० सप्टेंबरपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघता ३० सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करेल तर उर्वरित दोन सामन्यासाठी तिलक वर्माकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आलेली आहे. यावेळी पाटीदार उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी आणि शेवटचा सामना ५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील.

विराट कोहली- रोहित शर्माला संघात स्थान नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचे दोन्ही स्टार खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अधिकृत मालिकेपूर्वी भारताच्या अ संघाकडून खेळू इच्छित होते, परंतु बीसीसीआयने रोहित आणि विराट दोघांचीही टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळताना दिसू शकतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनीही कसोटी क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु अजूनही दोन्ही खेळाडू एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

India Vs Australia Series
India W Vs Australia W: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ODIचा थरार, कधी अन् कुठे पाहू शकता, वाचा सविस्तर

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला एकदिवसीय सामना: ३० सप्टेंबर, कानपूर

दुसरा एकदिवसीय सामना: ३ ऑक्टोबर, कानपूर

तिसरा एकदिवसीय सामना: ५ ऑक्टोबर, कानपूर

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ

रजत पाटीदार (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.

दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ

टिळक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक सिंग, हरिषेक पोरेल, अरविषेश पोरेल (अभिषेक)

India Vs Australia Series
High Court Notice To BCCI: आईशप्पथ, खेळाडूंनी फस्त केली ३५ लाखांची केळी, बीसीसीआयचा बीपी वाढला; हायकोर्ट अ‍ॅक्शन मोडमध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com