India vs Pakistan : साहिबजादा फरहानचा माज उतरला; विकेट पडताच संतापला...पाहा व्हिडिओ

India vs Pakistan update : साहिबजादा फरहानने टीम इंडियाच्या गोलंदाजाची धुलाई केली. यावेळी देखील साहिबजादाने सेलिब्रेशनने लक्ष वेधलं.
India vs Pakistan update
India vs Pakistan updateSaam tv
Published On
Summary

साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकलं.

त्याने सामन्यात मागच्यावेळेसारखं गन सेलिब्रेशन केलं नाही.

आयसीसीच्या तंबीमुळे त्याने साधं सेलिब्रेशन केलं

पाकिस्तानचा सलामीवर साहिबजादा फरहानने टीम इंडियाच्या विरोधात अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली. साहिबजादाने सुपर ४ सामन्यातही टीम इंडियाच्या विरोधात अर्धशतक ठोकलं होतं. मात्र, यंदा मागच्या वेळीसारखं गन सेलिब्रेश दिसलं नाही. आयसीसीच्या कारवाईमुळे साहिबजादाने आवरतं घेतल्याचं दिसून आलं. पाकिस्तानी चाहत्यांनी गन सेलिब्रेशनसाठी चिथावलं. मात्र, त्याने साध्या पद्धतीनेच सेलिब्रेश केलं.

साहिबजादाने ३६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. ३८ चेंडूत त्याने ५७ धावा कुटल्या. या डावात त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्याने १५० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर साहिबजादा झेलबाद झाला.

India vs Pakistan update
Kalyan Rain : कल्याण-डोंबिवलीत मुसळधार! खाडीलगतच्या रहिवाशांची चिंता वाढली, हवामान विभागाने काय इशारा दिला?

तिलक वर्माने त्याचा कॅच घेतला. सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंची चांगली सुरुवात झाली. झेलबाद झाल्यानंतर साहिबजादाने बॅट जमिनीवर आपटत संताप व्यक्त केला. साहिबजादा बाद झाल्यावर मैदानात टीम इंडियाच्या खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं.

India vs Pakistan update
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

आशिया कप २०२५ मध्ये त्याने सात सामन्यात साहिबजादाने एकूण २१७ धावा कुटल्या. त्याने स्पर्धेत ३१ सरासरीने धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट ११६.०४ टक्के इतका होता. या स्पर्धेत त्याने १४ चौकार आणि ११ षटकार लगावले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत त्याचं तिसरं स्थान आहे. तर अव्वल स्थानावर ६ सामन्यात ३०० हून अधिक करणारा अभिषेक शर्मा आहे.

भारताची प्लेईंग ११ -

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल

पाकिस्तानची प्लेईंग ११ -

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, अबरार अहमद, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सलमान अली आगा, हुसैन तलत, मोहम्मद हॅरिस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com