
आशिया कप २०२५ फायनलमध्ये भारताने १४७ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच तीन गडी बाद
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या ३ षटकांतच भारतावर दडपण
ही खराब सुरुवात पाहून भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण
सामना सध्या अत्यंत तणावपूर्ण
आशिया कप २०२५ स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला १४७ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे पहिले ३ गडी बाद झाले आहेत. टीम इंडियाचे ३ स्टार खेळाडू तंबूत परतल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचे २० धावांच्या आतच तीन विकेट गेले. चांगल्या फॉर्म खेळणाऱ्या अभिषेक शर्माची जादू फारशी चालली नाही. अभिषेक शर्मा ५ धावांवर बाद झाला. सुर्यकुमार अवघ्या १ चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल देखील १२ धावांवर बाद झाला.
तिन्ही स्टार खेळाडू बाद झाल्याने टीम इंडियावर दडपण वाढलं आहे. तिन्ही तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर आता संपूर्ण तिलक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांच्यावर असणार आहे. संघाला जिंकवण्यासाठी उर्वरित फलंदाजांवरही मोठं दडपण असणार आहे. भारताचे तिन्ही खेळाडू बाद झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.
दुसरीकडे टीम इंडियासाठी कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. कुलदीपने ४ षटकात ३० धावा देऊन ४ गडी बाद केले. त्याने एकाच षटकात तीन गडी बाद केले. कुलदीपच्या भेदक मारा करून गडी बाद करत पाकिस्तानचं खच्चीकरण केलं. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराहनेही चांगली गोलंदाजी केली.