Pahalgam Terror Attack  Saam tv
मुंबई/पुणे

Pahalgam Terror Attack : आता कौतुकाची थाप कोण देणार? दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या हर्षलने परीक्षेत मिळवलं घवघवीत यश

Pahalgam Terror Attack News : दहशतवादी हल्ल्यात वडील गमावलेल्या हर्षलने बी कॉम परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. त्याच्या नातेवाईकाने ही माहिती दिली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील ६ पर्यटकांना संपवलं. या दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील संजय लेले,अतुल मोने, हेमंत जोशी या तिन्ही मावसभावंडांची हत्या केली. मुलांची परीक्षा संपल्याने काश्मीर फिरायला गेलेल्या तिन्ही मावसभावंडांची हत्या झाल्याने त्यांची मुले पोरकी झाली आहेत. याच मावसभावंडातील संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने बी कॉम परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र, यश मिळवूनही हर्षलच्या चेहऱ्यावर कोणताच आनंद दिसत नाहीये. कौतुकाची थाप देणारे वडील गमावल्याने हर्षलच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले यांचा मृत्यू झाला. संजय लेले यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच त्यांच्या सोसायटीत भयान शांतता पसरली होती. गेल्या काही वर्षांपासून लेले हे डोंबिवली पश्चिम येथील श्री विजयश्री सोसायटीत राहत होते. संजय लेले यांच्या मृत्यूने त्यांच्या परिसरातील सर्व रहिवाशांनाही मोठा धक्का बसला होता. दहशतवांद्यानी संजय लेले यांच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या भीषण हल्ल्यात संजय लेले यांचा मृत्यू झाला होता.

लेले कुटुंबीयांनी जीवघेणा थरार अनुभवल्यानंतर डोंबिवलीतील पत्रकार परिषदेत आपबीती सांगितली होती. हर्षल लेले याने काश्मीरमधील संपूर्ण परिस्थिती सांगितली होती. पहलगाममधील हल्ल्याचा थरार सांगताना हर्षलला अश्रू अनावर झाले होते. हाच हर्षल बी कॉम परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. हर्षलने बी कॉम परीक्षेत ए ग्रेड मिळवला आहे.

परीक्षा संपल्यानंतर सुट्ट्या मिळाल्याने काश्मीरला फिरायला गेलेल्या लेले कुटुंबीयांनी पहिल्याच दिवशी जीवघेणा थरार अनुभवला. सहलीच्या पहिलीच दिवशी संजय लेले यांचा मृत्यू झाला. आज बी कॉमचा निकाल लागला. या परीक्षेत हर्षल ए ग्रेडने उत्तीर्ण झाल्याची माहिती त्याचे नातेवाईक राजेश कदम यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT