Pahalgam Terror Attack : काश्मीरात नरसंहार, महायुतीत श्रेयवाद; महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला, पाहा स्पेशल रिपोर्ट

Pahalgam Terror Attack News : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक भीतीच्या छायेत आहेत.. तर पर्यटकांच्या सोडवणूकीवरुन महायुतीत श्रेयवाद रंगल्याचं समोर आलंय.. ते नेमकं कसं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
Pahalgam
Pahalgam Terror AttackSaam tv
Published On

पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 लोकांचा मृत्यू झालाय... त्यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय.. त्यामुळे काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना काश्मीरला पाठवलं...तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विशेष विमानाने काश्मीरची वाट धरली.. त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आहे.

Pahalgam
Seema haider : बॉयफ्रेंडसाठी पाकिस्तानाहून भारतात आलेली सीमा हैदर स्वगृही जाणार? महत्वाची माहिती आली समोर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पर्यटकांच्या भेटीगाठी घेत असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी 83 पर्यटकांना विशेष विमानाने परत आणणार असल्याचं जाहीर केलंय... तर शिंदे गटाच्या खासदाराने बढायांची हद्द पार करत अकलेचे तारे तोडलेत. 'आयुष्यात विमान पाहिलं नाही, अशा लोकांना एकनाथ शिंदे घेऊन आलेत, हे वक्तव्य घेणं, असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

Pahalgam
Pahalgam terror attack : मुस्लीम असल्याची लाज वाटतेय; पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यावर गायक मनातलं बोलून गेला

एकीकडे राज्य सरकार मदत करत असताना शिंदे गट मात्र स्वतंत्ररित्या मदतीसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महायुतीतील या श्रेयवादावर टीकेची झोड उठवली गेलीय.. तर श्रेयवादाची ही मालिका इथंच थांबत नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील मृत पर्यटकांच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आणि शिंदे गटानेही तातडीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांना विमानतळावर पाठवल्याचं पाहायला मिळालं... मात्र संकटाच्या काळात राजकीय श्रेयवाद रंगल्याने साम टीव्हीने त्यावर सवाल उपस्थित केलेत.

Pahalgam
Fact Check : सरकार देणार मोफत स्मार्ट फोन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

सामचे सवाल

उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज?

मंत्री गिरीष महाजन असताना शिंदेंना जाऊन काय मिळणार आहे?

उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती?

अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची काय गरज होती?

नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही?

तर शिंदे गटाने महायुतीत श्रेयवादाच्या लढाईचा दावा फेटाळून लावलाय...

आतापर्यंत सरकारने 300 पर्यटकांना परत आणलंय.. मात्र संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न पडता कंट्रोल रुममधून यंत्रणेला आदेश देत मदत पोहचवणं योग्य ठरणार नाही का? हा राज्यभरातून विचारला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com