Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Veg Market Sees 80% Drop in Buyers in Mumbai: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भाजी मार्केटवर होताना दिसत आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली.
Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ
Veg Market Sees 80% Drop in Buyers in MumbaiSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईमध्ये गॅस सिलिंडर तुटवड्याचा भाजी मार्केटवर परिणाम

  • भायखळा भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली

  • हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद असल्याने भाजी ऑर्डर्स ८० टक्क्यांनी कमी

  • भाजी विक्रेत्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती.

इराण-इस्राईल युद्धाचा फटका आता थेट आपल्या किचन आणि बाजारपेठांवर होताना दिसत आहे. युद्धामुळे गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याचा मोठा फटका आता भाजी मार्केटला बसला आहे. कारण हॉटेल आणि रेस्टॉरंट्सकडून भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ऑर्डर्स ८० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मुंबईतल्या भायखळा भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी नेहमी मोठी गर्दी होत असते. पण आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच परिणाम आता भाजी मार्केटवर होताना दिसत आहे. कारण भाजी मार्केटमध्ये भाज्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. हॉटेल व्यवसायिकांनी हॉटेल्स, रेस्टॉरेंट्स बंद ठेवल्यामुळे त्यांनी भाज्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजी विक्रेते चिंतेत आले आहेत.

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ
LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमात मोठा बदल, २१ दिवसांची अट; किंमती वाढल्यानंतर नेमका काय केला बदल?

भायखळा मार्केटच्या संचालकांनी सांगितले की, आजच्या घडीला मार्केटमध्ये जवळपास ८० टक्के गिऱ्हाईक नाहीत. फक्त २० टक्के गिऱ्हाईक येत आहे. फक्त घरामध्ये लागणाऱ्या भाज्या खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईक येत आहेत. हॉटेलवाल्यांच्या ऑर्डर्स बंद झाल्या आहेत. परिस्थिती खूपच गंभीर आहे. माल रोज नवीन येतो पण तो विकला गेला नाही तर तो खराब होतो आणि दुसऱ्या दिवशी तो फेकून दिला जातो.

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ
Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कुठे काय स्थिती?

'भाज्यांना उठाव अजिबात नाही. पालेभाज्या खराब होतात. त्यामुळे आता माल विकला गेला नाही तर तो उद्या फेकण्याची वेळ येणार आहे. ८० टक्के रेस्टॉरेंट्स बंद झाली आहेत. हॉटेल्स त्यांनी पूर्णपणे बंद केली आहेत. गिऱ्हाईक येत नसल्यामुळे भाजी विक्रेते अडचणीत आले आहेत.' दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा १३ वा दिवस आहे. या युद्धाचा परिणाम म्हणजे भारतामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. काही हॉटेल आणि रेस्टॉरेंट मालकांनी गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ
Lpg Gas Cylinder: तुमच्या किचनमध्ये कोणतं इंधन वापरतात? LPG, PNG, CNG आणि LNG नेमका वापर काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com