Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कुठे काय स्थिती?

LPG Shortage Panic in Maharashtra: इराण आणि इस्राइल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातही बसत आहेत. या युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांची चिंता वाढली असून त्यांनी गॅस एजन्सीबाहेर गर्दी केली आहे.
Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा;  कुठे काय स्थिती?
LPG Shortage Panic in Maharashtra Saam Tv
Published On

Summary -

  • इराण–इस्राइल युद्धाचा फटका बसायला सुरूवात

  • युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला

  • महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा

  • हॉटेल आणि उद्योग क्षेत्राला कमर्शियल गॅस पुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता

मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्राइल या देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. या युद्धाचा फटका आता संपूर्ण जगभराला बसताना दिसत आहे. या दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे इंधनाचा तुटवणा निर्माण झाला आहे. इस्राइलने इराणच्या तेलसाठ्यांवर हल्ले केले. त्यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात एलपीजी सिलिंडरबद्दल चिंता वाढत चालली आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिक चिंतेत आले आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा परिणाम आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरिंग उद्योगाला सर्वात जास्त बसला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस सिंलिंडरचा तुटवडा जाणून लागला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. राज्यात कुठे काय परिस्थिती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

रत्नागिरी -

रत्नागिरी शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या बाहेर गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी गर्दी झाली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने नागरिकांनी गॅस सिलिंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. गॅस एजन्सीने सध्या तरी घरगुती गॅसचा पुरेसा सिलेंडर साठा असल्याचा दावा केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने सध्या रत्नागिरीकर गॅस एजन्सीच्या बाहेर दिसत आहेत. सिलिंडर रिफिल बुकिंगचे नियमात बदल करण्यात आला आहे. सिलिंडर रिफिल बुकिंग आता २१ दिवसांऐवजी २५ दिवसांचे असणार आहे. घरातील दुसरा सिलेंडर देखील संपत आल्यानं गृहीणींची चिंता वाढली आहे.

Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा;  कुठे काय स्थिती?
LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमात मोठा बदल, २१ दिवसांची अट; किंमती वाढल्यानंतर नेमका काय केला बदल?

कोल्हापूर -

इराण- इस्राइल युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होईल याची भीती नागरिकांमध्ये आहे. कोल्हापुरातील गॅस एजन्सीच्या बाहेर सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. आपल्यालाच वेळेत गॅस मिळावा यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. गॅस एजन्सी डीलर्सकडून नागरिकांना शांततेचे आवाहन केले जात आहे.

पुणे -

देशभरातील ग्राहकांना एचपीसीएल कंपनीकडून मेसेज पाठवण्यात आला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून सर्व ग्राहकांना मेसेज पाठवण्यात आला आहे. देशात इंधनाचा तुटवडा नाही असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. देशभरात गॅस आणि इतर इंधनाचा भरपूर साठा उपलब्ध असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. नागरिकांनी चिंता करू नये असे कंपनीकडून अश्वस्त केले जात आहे.

Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा;  कुठे काय स्थिती?
Gas Cylinder : घरगुती गॅस अन् व्यावसायिक गॅस यात नेमका फरक काय? वाचा सविस्तर

लातूर -

इराण आणि इस्राइलमधील युद्धजन्य परिस्थितीचा लातूरमध्ये देखील घरगुती गॅसला फटका बसलाय. अनेक कंपनीच्या गॅस एजन्सीवर गॅसचा तुटवडा पाहायला मिळत आहे. तर हॉटेल व्यवसायिकांसाठी वापरात येणाऱ्या कमर्शियल गॅस देखील वेळेत मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांची ओरड आहे. गॅस एजन्सी कार्यालय बंद करण्याची वेळ एजन्सी मालकांवर आली आहे. तर सकाळपासून नागरिकांनी एजन्सीबाहेर रांगा लावल्या आहेत. ऑनलाइन बुकिंग झाले असताना देखील गॅस सिलिंडर मिळत नाही असे नागरिक सांगत आहेत.

Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा;  कुठे काय स्थिती?
LPG Gas Rules : इस्रायल-इराण युद्धाची झळ स्वयंपाक घराला, एलपीजी सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठा बदल

छत्रपती संभाजीनगर -

आज दुपारपासून छत्रपती संभाजी नगरच्या वाळुज एमआयडीसीमधील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणाम दिसून येईल. काही कंपन्या आज दुपारपासून बंद पडतील अशी स्थिती आहे. काही जणांकडे उद्यापर्यंत साठा असल्यामुळे उद्यापर्यंत चालतील. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. गॅस पुरवठा थांबवल्यास संपूर्ण हॉटेल उद्योगावर गंभीर आणि तात्काळ परिणाम होईल त्यामुळं त्याबाबत पाऊले उचलावीत असे या पत्रात म्हटले आहे.

नागपूर -

नागपुरात सध्या सिलेंडर तुटवडा जाणवत असताना जिल्हा प्रशासनाचे दावे असले तरी यासाठी जिल्हा प्रशासनाने पथक तयार करून शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्सना भेटी द्यायला सुरुवात केली आहे. या पथकामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह शहराचे अन्न पुरवठा अधिकारी आणि गॅस एजन्सीचे अधिकारी मिळून वेगवेगळ्या हॉटेल्सला भेटी देत आहेत. गॅसचा तुटवडा आढळत असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहनही केले जात आहे.

Gas Cylinder: युद्धाच्या झळा महाराष्ट्रात, गॅस सिलिंडरचा तुटवडा; गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा;  कुठे काय स्थिती?
LPG Gas Cylinder: महत्वाची बातमी! केवायसी न केलेल्यांना गॅस सिलिंडर मिळणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com