Gas Cylinder : घरगुती गॅस अन् व्यावसायिक गॅस यात नेमका फरक काय? वाचा सविस्तर

Shreya Maskar

गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या

सध्या गॅस सिलेंडरचे दर वाढताना दिसत आहे. घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती 115 रुपयांनी वाढल्या आहेत. याचा सर्व सामान्यांना मोठा फटका बसला.

Domestic VS Commercial Gas | google

उद्देश

घरगुती गॅस हा घरगुती वापरासाठी उपयोगात येतो. उदा. स्वयंपाक व्यावसायिक गॅस हा हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा, कँटीन यांसारख्या व्यवसायिक ठिकाणी वापरला जातो.

Domestic VS Commercial Gas | google

सिलेंडरचा रंग

घरगुती गॅस सिलेंडरचा रंग लाल असतो. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा रंग निळा असतो.

Domestic VS Commercial Gas | google

किंमत

घरगुती गॅसवर सरकारकडून काही वेळा सबसिडी मिळते, त्यामुळे त्याची लकिंमत कमी असते. मात्र व्यावसायिक गॅसवर सबसिडी नसते, त्यामुळे किंमत जास्त असते.व्यावसायिक गॅसचे दर बाजारातील मागणीनुसार बदलतात.

Domestic VS Commercial Gas | google

सिलेंडरचा वजन

घरगुती गॅसच्या सिलेंडरचे वजन साधारण 14.2 kg गॅस असते. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर 19 kgचा असतो.

Domestic VS Commercial Gas | google

सुरक्षितता

घरगुती गॅस सिलेंडरची वर्षातून एकदा तपासणी केली जाते. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरासाठी नियमित आणि कडक तपासणी आवश्यक असते.

Domestic VS Commercial Gas | google

दाब

व्यावसायिक गॅस प्रणाली उच्च प्रवाहासाठी डिझाइन केलेली असते. तर घरगुती गॅसचा प्रवाह कमी असतो.

Domestic VS Commercial Gas | google

मुंबईत सिलेंडरचे दर

मुंबईत सिलेंडरची किंमत 852.50 रुपयांवरुन 912.50 रुपये झाली आहे. या आकड्यांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

Domestic VS Commercial Gas | google

NEXT : लाल भरजरी साडी अन् पांढरा शुभ्र धोती-कुर्ता; रश्मिका-विजयचा रॉयल लूक पाहून चाहत्यांना याडं लागलं

Rashmika-Vijay Reception Photo | instagram
येथे क्लिक करा...