LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमात मोठा बदल, २१ दिवसांची अट; किंमती वाढल्यानंतर नेमका काय केला बदल?

LPG Cylinder Gas Booking Period Rule Change: एलपीजी गॅसच्या किंमतीनंतर आता नियमातदेखील बदल करण्यात आले आहे. आता दोन गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २१ दिवसांचा कालावधी असणे अनिवार्य आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderSaam Tv
Published On
Summary

एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या

आता एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल

दोन गॅस बुकिंगमध्ये २१ दिवसांचा वेळ असणे अनिवार्य

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी गॅसच्या किंमती तब्बल ६० रुपयांनी महागल्या आहेत. तर १९ किलो वजनाच्या कमर्शियल गॅसच्या किंमती ११५ रुपयांनी महागल्या आहेत. दरम्यान, यानंतर आता ग्राहकांना आणखी एक धक्का बसला आहे. एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांत महत्त्वाचे बदल केले आहे.

LPG Gas Cylinder
RBI Note Rules: होळीच्या रंगामुळे नोटा खराब झाल्या तर काय करावे? RBIचे नवे नियम वाचाच

एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमात बदल (LPG Gas Booking Rule Change)

एलपीजी गॅस बुकिंगसाठी १५ दिवसांचा वेळ असणे गरजेचे होते. दोन गॅस बुकिंगच्या काळात १५ दिवसांचा कालावधी असणे अनिवार्य होते. आता हे दिवस वाढवून २१ करण्यात आले आहेत. आता दोन गॅस बुकिंगमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. तुम्हाला २१ दिवसांच्या आत पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलिंडर बुक करता येणार नाही.

एलपीजी गॅसच्या बुकिंगमधील बदल तात्काळ स्वरुपात लागू करण्यात आले आहे. यासाठी एजन्सीचे सॉफ्टवेअर लॉक केले आहे. दरम्यान, अजून तरी बुकिंग सिस्टीममध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, लवकरच २१ दिवसानंतर गॅस बुकिंगला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सिलिंडर असेल तर त्यानंतर २१ दिवसांनीच दुसरा गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे.

आतापर्यंत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या एजन्सीचे गॅस सिलिंडर तुम्ही १५ दिवसात बुक करु शकत होता. मात्र, हा नवीन निर्णय लागू झाल्यानंतर २१ दिवसांनी दुसरा गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे.

LPG Gas Cylinder
Rule Change: LPG गॅस, सिगारेट ते बँका; १ फेब्रुवारीपासून या नियमात होणार बदल

वर्षभरात फक्त १५ सिलिंडर

तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरची विक्री आधीसारखीच ठेवली आहे. दरवर्षी फक्त १२ अनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे. तीन अतिरिक्त विनाअनुदानित सिलिंडर खरेदी करता येतील. म्हणजे १एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत तुम्ही फक्त १५ गॅस सिलिंडर खरेदी करु शकतात.

LPG Gas Cylinder
LPG Price Hike: टेन्शन वाढवणारी बातमी! एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com