Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले

Nashik Human Trafficking News : नाशिकमध्ये १९ वर्षीय तरुणीची २ लाख रुपयांत विक्री करून जबरदस्ती लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणीची सुखरूप सुटका केली असून मानवी तस्करीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले
Nashik Human Trafficking NewsSaam Tv
Published On
Summary
  • १९ वर्षीय तरुणीची २ लाखांत विक्री करून जबरदस्ती लग्न लावल्याचा आरोप

  • इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून मालेगावमार्गे जातेगाव येथे नेले

  • सातपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणीची सुटका केली

  • मानवी तस्करीच्या संशयावरून सखोल तपास सुरू

अभिजीत सोनावणे, नाशिक

कल्याणमध्ये दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या असल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये मानवी तस्करीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीची २ लाख रुपयांत विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. सातपूर पोलिस ठाणे यांनी तातडीने कारवाई करत तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कार्बन नाका परिसरातील तरुणी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तरुणीने फोनवरून दोन महिलांनी इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून तिला मालेगावमार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेऊन जबरदस्तीने लग्न लावल्याची माहिती दिली.

Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले
Iran Israel War Update : इस्रायल-इराणच्या युद्धाचा भारतीयांना फटका, विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अकडले, लेटेस्ट अपडेट आली समोर

या प्रकरणात राणी आणि भागी नावाच्या महिलांवर संशय व्यक्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांना घेराव घालत विरोध केला, मात्र अतिरिक्त कुमक मागवून अखेर तरुणीची सुटका करण्यात यश आले.

Nashik : नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय? १९ वर्षाच्या तरूणीची २ लाखांत विक्री, जबरदस्तीने लग्न लावले
Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मानवी तस्करीच्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे. नाशिकमधील या घटनेमुळे जबरदस्ती विवाह आणि मानवी तस्करीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com