Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती

Iran Israel War Update News : इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील २३ नागरिक दुबईत अडकले आहेत. फ्लाइट रद्द झाल्याने आणि पैसे संपल्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला  गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती
Iran Israel War Update NewsSaam tv
Published On
Summary
  • इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय फ्लाइट सेवा विस्कळीत

  • शहापूरमधी ल २३ नागरिक दुबईत अडकले

  • पैसे संपल्याने अडचणीत

  • भारत सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

फैय्याज शेख, शहापूर

USA Iran Israel War Thane Shahapur 23 Citizens Stuck Dubai अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. इराण इजराइल अमेरिका यांच्यात युद्ध सुरू असल्याने भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात इतरत्र देशात अडकलेले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील २३ नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे नागरिक दुबईला असल्याची माहिती समोर येत आहे, यामध्ये वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत .

मिळालेल्या माहितीनुसार, हे २३ जण टूर्सच्या मध्यमातून दुबईला फिरायला गेले होते. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२:४५ वाजता फ्लाइटने भारतात येणार होते, मात्र युद्धामुळे भारतात येणं रद्द झाल. हे सर्व भारतीय नागरिक दुबईतील ए 1 फहादी स्ट्रीटवरील ग्रँड अॅस्टोरिया हाॅटेलमध्ये आहेत . परतीचा प्रवास असल्याने सध्या या लोकांकडे पैसे शिल्लक राहिले नाही. यामुळे हॉटेलच बिल व खर्च आता देणे अशक्य झाले असल्याने त्यांनी भारतीय सरकारला विनंती केली आहे की, आम्हाला काहीतरी मदत द्यावी.

Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला  गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती
Shocking : परीक्षेला जाण्याआधी १० वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, पेपरला जाणार इतक्यात भयंकर घडलं

इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून पहिला हल्ला करण्यात आला. या युद्धाची ठिणगी शनिवारी दुपारपासून पडली. तेहरानसह इराणच्या अनेक भागांत इस्रायलने आतापर्यंत २०० हून अधिक हल्ले केले आहेत.

Iran Israel War : ठाण्यातून २३ जण दुबईला  गेले, अचानक युद्धाचा भडका; भारतात येण्याचे मार्ग बंद, खिशात पैसा नाही, PM मोदींकडे विनंती
Iran Israel War Update : इस्रायल-इराणच्या युद्धाचा भारतीयांना फटका, विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अकडले, लेटेस्ट अपडेट आली समोर

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या १० मोठ्या शहरांवर भीषण हवाई हल्ले केलेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला असून संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या युद्धाजन्य परिस्थितीचा जगभरात परिणाम होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com